• Sat. Sep 21st, 2024
सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरेंची फसवणुकीचा प्रयत्न, ते दिल्लीपुढे झुकणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्याची सभा मंगळवारी सायंकाळी मुंबईत होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या विरोधात, मराठा समाज पेटला, राम सातपुतेंचा कार्यक्रम उधळला, सोलापुरात भाजप टेन्शनमध्ये
वडेट्टीवार म्हणाले, “राज ठाकरे हे वाघ माणूस आहे. पण त्यांचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाही. पण दिल्लीची वारी करून त्यांना यावे लागले यात कुठेतरी राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम होत आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे.

मोदींजीसाठी छत्रपती संभाजीनगरचा खासदार निवडून आणणार, कराड पिता-पुत्राचा संकल्प

ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे आज जी भूमिका घेणार आहेत ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असावी, असा अंदाज प्रत्येकजण बांधत आहे. राज ठाकरे दिल्लीपुढे कधीच झुकणार नाहीत, अशी मराठी जनतेला आशा आहे. त्यामुळे मला वाटते की ते आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच असेल. आज जे काय बोलतील आणि ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेल. ते दिल्ली पुढे झुकणार नाही, असे मला वाटते. मुनगंटीवार यांच्या बाबतीत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, त्यांचे वक्तव्य संस्कृतिक आहे की असंस्कृतिक आहे. त्यांच्या या बोलण्यावरून राज्याच्या एकूणच सामाजिक आणि संस्कृतीला काडीमा फासणारे शब्द आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. कधीतरीचा आधार घेऊन अशा पद्धतीने शब्दप्रयोग करणे कुणालाही पटलेलं नाही, असे ही वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed