मोंदींच्या सभेवर जोरदार टीका
काल तीन गोष्टींचा एकत्र योग, सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा, असा विचित्र योग पहिल्यांदा देशात आलाय. हा फार विचित्र योग. काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं, ज्याला शिवसेनाप्रमुख कांगडाबाई म्हणायचे, मी ज्या पक्षाला भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो त्या पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी यांचं होतं. आम्ही यापुढे जे उत्तर देऊ, ते पंतप्रधानांना उत्तर दिलं असं समजू नये, आमच्याकडून देशाच्या पंतप्रधानांचा अनादर होणार नाही.
शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करुन हे देशभरातील पक्षांना सतवत आहेत, धाडी टाकत आहेत, अटक करत आहेत, धमक्या देत आहे. यांच्यात ताकद नाही, म्हणून भेकड म्हणतो. यांच्याकडे कोणीही नेता निर्माण झालेला नाही, विचारांचा आदर्श नाही, म्हणून भाकड म्हणतो. तर भ्रष्ट यासाठी की संपूर्ण देशातील भ्रष्ट तेतुका मेळवावा आणि भाजप पक्ष वाढवावा, असं त्यांचं धोरण आहे. आधी एनडीए एक ताकदवान आघाडी होती, तो आता ठिगळांचा पक्ष झाला आहे.
बाहेरील व्यक्तीने येऊन असली सेना, नकली सेना म्हणायचं म्हणजे कळस – उद्धव ठाकरे
जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदी हे हिमालयात असतील, महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तीने येऊन महाराष्ट्रातील जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कळस झाला, यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे.
कोणाला किती जागा?
शिवसेना
२१ जागा – जळगाव, परभणी , नाशिक, पालघर, कळ्याण, ठाणे, रायगड., मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई इशान्य,
काँग्रेस
१७ जागा – नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गड-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुबंई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, ऩॉर्थ मुंबई
राष्ट्रवादी
१० जागा – बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, हिंगोली, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
इच्छा सर्वांची असते पण… – उद्धव ठाकरे
युती किंवा आघाडी म्हटल्यावर शक्य असेल तोपर्यंत आम्ही चर्चा करत असतो. तो प्रत्येकाचा अधिकार असतो. पण, एक क्षण असा येतो जेव्हा एकमेकांना समजून, जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी करावी लागते. तो क्षण आज आलाय, सर्वांच्या मनातल्या शंकांना उत्तर मिळाली असेल. इच्छा, महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते, पण जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट ठेवल्यानंतर कशासाठी आणि कोणासाठी लढतोय हे डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. आता कोणाच्याही मनात प्रश्न नाही, प्रत्येकजण जोमाने कामाला लागलेले आहेत.