• Sun. Nov 24th, 2024

    ‘जहाजबांधणी’तून दोन कोटींचा गंडा, फसविणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

    ‘जहाजबांधणी’तून दोन कोटींचा गंडा, फसविणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

    मुंबई : देश-विदेशांत जहाजाने साहित्य पोहोचविण्याचा व्यवसाय करणाऱ्या माझगाव येथील एका कंपनीची दोन कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. मेसर्स मार सिलाओ मेरिटाइम या कंपनीने नवीन जहाज देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माझगावच्या या कंपनीने भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    या कंपन्यांमध्ये जहाजबांधणीचा करार करण्यात आला आणि त्यानुसार शंभर दिवसांच्या आतमध्ये बोट पूर्ण करण्याचे ठरले. प्रत्येक टप्प्यावर थोडी थोडी रक्कम देण्याचे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार माझगावच्या कंपनीकडून मेसर्स मार सिलाओ मेरिटाइम या कंपनीच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले जात होते. थोडे थोडे करून सुमारे दोन कोटी रुपये कंपनीला देण्यात आले. इतकी रक्कम अदा केल्यानंतर बोटीचे काम कुठपर्यंत आले हे पाहण्यासाठी माझगाव येथील कंपनीचे प्रतिनिधी दुबईला गेला. मात्र कंपनीने बोटीचे काम भारतामध्येच कोचिन येथे सुरू असल्याचे सांगितले.

    हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
    कंपनीच्या वतीने बोटीचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे फोटो पाठवले जात होते. कराराची मुदत जवळ अली तरी बोट पूर्ण न झाल्याने कंपनीचा आणखी एक प्रतिनिधी कोचिनला गेला. त्यावेळी प्रत्यक्षात तेथे असे काही काम सुरू नसल्याचे दिसून आले. येथील यार्ड मालकाकडे चौकशी केली असता मेसर्स मार सिलाओ मेरिटाइम या कंपनीमार्फत कोणत्याही बोटीचे बांधकाम सुरू नसल्याचे सांगण्यात आले. यावर कंपनीच्या प्रतिनिधींकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

    पुण्यातील प्रणव नोकरीसाठी अमेरिकेत गेला, पण जहाजावरुन बेपत्ता; शोधमोहिमही संपली, कुटुंब धास्तावलं!

    फसवणूक होत असल्याचे लक्षात असल्याचे लक्षात येताच माझगावच्या कंपनीने पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित कंपनी आणि त्यांच्या प्रतिनिधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *