गेल्या म्हणजेच २०१९च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात ‘कपबशी’ चिन्ह तर अकोल्यात ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह मिळाले होते. तर अकोल्यातून २०१४च्या निवडणुकीत कपबशी, २००९ मध्ये ‘पतंग’ चिन्हावर आंबेडकर निवडणूक लढले होते. आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून ते ‘प्रेशर कुकर’ चिन्हावर निवडणूक लढणार आहे.
दरम्यान भाजपचे बंडखोर नारायण गव्हाणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे अभय पाटील यांच्या उमेदवारीने यंदा भाजपाच्या मताधिक्यात फटका बसण्याची शक्यता आहे. अशा चर्चा सुरू आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाभराचे लक्ष असणार आहे. दिवसेंदिवस अकोला लोकसभा निवडणूक अतिशय रंजक होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली असून घोडा मैदान जवळ आहे. मतदारांचा कौल कोणाकडे असणार? कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.
‘मागील २०१९चा’ अकोला लोकसभेचा निकाल :
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :
– संजय धोत्रे (भाजप): ५,५४,४४४
– प्रकाश आंबेडकर(वंचित बहूजन आघाडी): २,७८,८४८
– हिदायत पटेल (काँग्रेस): २,५४,३७०