• Mon. Nov 25th, 2024

    एकनाथ खडसेंची पलटी, राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय, रोहित पवार यांचे भाजपवर गंभीर आरोप

    एकनाथ खडसेंची पलटी, राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय, रोहित पवार यांचे भाजपवर गंभीर आरोप

    आदित्य भवार, पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का देत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढील दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दिली आहे. परंतु खडसे हे स्वतःच्या मनाने जात नसून भाजप त्यांना ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे जेलमध्ये जण्यापेक्षा भाजपात गेलेले बरे, अशी त्यांची मनस्थिती असल्याचे सांगून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची रविवारी बैठक संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करून खडसेंच्या मनस्थितीचा अंदाज लावला.
    मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आणि भविष्यातही राहणार, रोहिणी खडसे यांनी स्पष्टच सांगितलं

    रोहित पवार म्हणाले, “खडसे साहेबांबद्दल मी फार काही बोलणार नाही पण ते खूप अडचणीत होत्या, त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर होता. खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती खालावलेली आहे. अश्या परिस्थितीत खोट्या फाईल काढून राजकीय वैमनस्यातून त्यांना जर जेलमध्ये टाकले आणि जेलमध्ये जाऊन जर आरोग्याला धोका झाला तर ते त्यांना परवडणार नव्हतं. मी खडसे साहेबांबदल व्यक्तिगत काही बोलणार नाही पण त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला गेला आहे”

    एकनाथ खडसे निव्वळ स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपमध्ये येतील; कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया


    पुढे रोहित पवार असं म्हणाले, तुम्ही ब्लॅकमेलिंग बदल बोलत तर अजित पवार दादा सोबत जे ८ ते १० मोठे नेते गेले आहेत आणि त्यांना मंत्री पद मिळाली त्यांना ब्लॅकमेलच केल गेलं होतं. त्यांच्या खोट्या फाइल काढून त्यांना ब्लॅकमेलच केले गेले होते. तसेच खडसे साहेबां बरोबर ब्लॅकमेलिंगचा वापर केला असेल म्हणून जेल मध्ये जण्यापेक्षा भाजपात गेलेलं बर असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *