मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे, एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे. याबाबत विश्वजीत कदम यांच्याबरोबर सुद्धा माझ्या फोनवर बोलणं झालं आहे, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
गिरीश महाजन हे मुंगेरीलाल – संजय राऊत
गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले, बेळगावमधील नेहमी भाजपाकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो. मराठी माणसाचा संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.