• Mon. Nov 25th, 2024
    विजय शिवतारेंकडे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा, सभेसाठी महत्त्वाची बैठक घेणार

    पुणे: बारामती लोकसभेसाठी विजय शिवतारे यांनी एकवेळी अजित पवार यांच्या विरोधात अस्त्र उगारले होते. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांचे बंड थंड झाले. आता विजय शिवतारे हे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यातसाठी प्रचारात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी येत्या गुरवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.

    माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांचे बंद थंड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिलं होत. याबाबत सासवड येथील पालखी मैदानावर सभा घेऊन पुरंदरच्या जाणते समोर याबाबत सांगण्याची अट शिवतारे यांनी घातली होती. त्यामुळे विजय शिवतारे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांची सासवड येथे गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
    आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ
    याबाबत नियोजनासाठी आज रविवार सभेच्या नियोजनार्थ महत्त्वपूर्ण बैठक सासवड आयोजित करण्यात आली आहे. शिवतारे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचे कसे नियोजन करतात हे या बैठकीतून कसे करता हे पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे आता सासवड मध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री लवकरच येतील आणि पुरंदरच्या विकासासाठी कोणत्या योजना जाहीर करतील याकडे पुरंदरच्या जनतेच लक्ष लागलं आहे.

    विजय शिवतारे अन् अजित पवार आमने-सामने, वर्षावर खलबतं; मध्यरात्री काय घडलं? संजय शिरसाटांनी सांगितलं

    शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्यावरही तालुक्यातून मोठी टीका झाली होती. अगदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवातरे यांना खडेबोल सुनावले होते. शिवसेनेच्या या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री कसे शांत करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed