• Sat. Sep 21st, 2024
पुणे – मुंबई महामार्गावरुन प्रवास करताय? पुढील ४ दिवस एक्पप्रेस वेबाबत महत्त्वाची अपडेट

प्रशांत श्रीमंदिलकर, लोणावळा, पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकदा मोठी आणि अवजड वाहने महामार्गावर बंद पडतात. त्यामुळे सर्व वाहन चालक आणि मालक संघटनांना महामार्ग पोलिसांकडून वाहतुकीच्या वेळेबाबत आवाहन करण्यात आलं आहे. येत्या ६ ते ९ एप्रिल रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवास करणं टाळावं असं आवाहन करण्यात आले आहे.महामार्ग पोलीस हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. पोलिसांकडून मागील वर्षीचा आढावा घेण्यात आला. त्यात सलग सुट्टया तसंच शाळा आणि महाविद्यालय यांना उन्हयाळ्याची सुट्टी लागल्यामुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाण वाढ होत असते. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाट हद्दीत घाट सेक्शन आणि मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि एन. एच ४८ असा संयुक्तीक महामार्ग एकत्र येत असल्याने लाँग विकेन्डला वाहनांचं प्रमाण अधिक होऊन वाहतूक संथ गतीने चालू असते.
युगांडातून दोहामार्गे नागपूरला, कस्टम विभागाला संशय, झडती घेताच धक्कादायक प्रकार समोर; काय घडलं?
याच पार्श्वभूमीवर अवजड वाहनं मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात आलं आहे की, ६ ते ९ एप्रिल दरम्यान मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी ६ ते दुपारी १२ च्या दरम्यान प्रवास टाळावा जेणेकरून त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसंच वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे, वाहन गरम होऊन बंद पडणे इत्यादी घटना टळू शकतील. तसंच इंधन आणि वेळेचीही बचत होईल. तसंच कार चालकांनी घाट सेक्शनमध्ये वाहतूक संथ गतीने चालू असताना ओ.सी. चा वापर करू नये, जेणेकरून वाहनाच्या क्लच प्लेटवर लोड येऊन वाहन बंद पडणार नाही.

हे नियोजन पोलीस महासंचालक वाहतूक सुखविंदर सिंह, पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक घनःश्याम पलंगे, पोलीस निरीक्षक श्रीमती गौरी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी, १५ तरुण पाण्यात पडले
काय आहेत नियम?
वाहतूकीचं नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहनं घाट सुरू होण्यापुर्वी शोल्डर लेनवर तसंच पार्कींगच्या ठिकाणी थांबवून हलक्या वाहनांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येतं.

कारच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पुणे मार्गावरील लोड कमी होईपर्यंत सतत १० ते १५ मिनिटाचा ब्लॉक घेऊन मुंबई मार्गावरील वाहतूक खंडाळा टनेल या ठिकाणी थांबवून पुणे मार्गावरील वाहतूक विरुद्ध दिशेने वळवण्यात येते आणि वाहतूक सुरळीत करण्यात येते.

तापमान वाढीमुळे अवजड वाहनंही बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलीस क्रेनच्या सहाय्याने लवकरात लवकर काढून वाहतूकीसाठी तिन लेन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

लोणावळ्यात स्थानिकांनी डेक्कन क्वीन एक्सप्रेस तब्बल २० मिनिटे रोखली

पहिल्या लेनवर चालणाऱ्या अवजड वाहन चालकांवर खटला दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

खालापूर टोल नाका येथे पी.ए. सिस्टमद्वारे अवजड वाहनांना सूचना देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed