भूषणसिंह होळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. किल्ला विकासा संबंधित ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर पवार आणि भूषणसिंह होळकर यांचा संपर्क वाढला. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीला खो देऊन महायुतीमधून परभणीची उमेदवारी मिळवली. जानकरांना महायुतीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर धनगर मतांचे विभाजन होऊ शकते. म्हणून बारामती आणि माढ्याचा विचार करता भूषणसिंह होळकर यांचा शरद पवार आपल्या पक्षात प्रवेश करून घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भूषणसिंह होळकर हे काही दिवसात पक्षात प्रवेश करतील अशी माहिती मिळाली आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आणि बहुजन एकता ठेवण्यासाठी भूषणसिंह होळकर हे भाजपच्या विरोधात प्रचार करणार, असे स्वतः भूषणसिंह होळकर म्हणाले आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
परभणीतून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा खासदार राहिलेल्या जाधवांना यंदाच्या लोकसभेला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र महायुतीने परभणीत जानकरांच्या रुपाने मोठं आव्हान उभं केलं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य असल्यामुळे ती मतंही निर्णायक ठरणार आहेत.