मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आरोग्य विभागाने ‘पाथ’ या संस्थेसोबत केलेल्या करारानुसार, सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये कृत्रीम प्रज्ञा (एआय), मेड टेक आणि डिजिटल इनोव्हेशन्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या १७ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची टप्प्याटप्याने स्थापना करण्यात आली आहे. डाटा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सेवा यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील ७२ अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट उपचार केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. हा प्रकल्प राज्यभर राबवण्यात येणार आहे. सर्वसमावेशक उपचारपद्धती देण्यासह तंत्रज्ञानाच्या सहकार्याने वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
आरोग्य केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्यकेंद्रां’मध्ये; तंत्रज्ञानाची जोड, सातारा पॅटर्न राज्यभर
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानाची जोड घेत या केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रां’मध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी कृत्रीम प्रज्ञेचीही (एआय) मदत घेतली जाणार आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात १७ ठिकाणी अशी केंद्रे सुरू झाली होती. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता, आता हा उपक्रम राज्यात राबवण्यात येणारआहे.