काय प्रकरण?
निफाड सहायक सहकारी निबंधक कार्यालयात रामदास मोगल यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार येवला कार्यालयाचे लेखापरिक्षक रवींद्र गुंजाळ यांच्या पथकाने मखमलाबाद येथील संशयितांच्या घरी झडती घेतली. त्यानुसार संशयित प्रवीण ज्ञानेश्वर काकड (वय ३८, रा. मानकर मळा) आणि पोपट वसंत काकड (४१, रा. शांतीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हे दोघेही सन २००८ पासून अवैधरित्या सावकारी करीत असल्याचे घरझडतीत उघडकीस झाले. दरम्यान, दीड-दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात अवैध सावकारीचा फास वाढला होता. तेव्हा सातपेक्षा जास्त व्यक्तींनी खासगी सावकारांच्या वसुलीला त्रासून आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी अनेक खासगी सावकारांवर कारवाई करण्यात आली. मात्र, पुन्हा खासगी सावकारी बोळाकत असल्याचे समोर येत आहे.
घरझडतीत काय?
– ४६ करारनामे; १०७ धनादेश जप्त
– ४४ कोरे स्टॅम्प पेपर; इतर नावांनी ५ स्टॅम्प पेपर
– कर्ज देयक, व्याज वसुलीच्या ३ डायऱ्या जप्त
– १२५ ते १५० व्यक्तींना कर्ज वाटप
– प्रतिमहा ५ टक्क्यांनी वसुली
– काही जणांची मालमत्ता कवडीमोल दराने हडप
– दोन्ही संशयितांकडे सावकारीचा परवाना नाही
अवैध सावकारीतून दोन्ही संशयितांनी दीडशे व्यक्तींकडून वसुली केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. सखोल तपासाचे निर्देश पथकाला दिले आहेत. त्याअंती कारवाई करण्यात येईल.- सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ