• Mon. Nov 25th, 2024

    कोपरगाव तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा! बोगस बिलं काढणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल, अधिकाऱ्याचे काय?

    कोपरगाव तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा! बोगस बिलं काढणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल, अधिकाऱ्याचे काय?

    मोबीन खान, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा समोर आला आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रक्कमेत कोपरगाव तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या संगनमताने तब्बल सहा लाख रुपयांचं बोगस बील काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सहीचा अधिकार असलेल्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? याची जोरदार चर्चा सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. मात्र संबंधित दोषींवर अद्याप कारवाई न झाल्याने पाणी कुठे मुरतंय असा संशय व्यक्त होत आहे.

    मागील वर्षी २५ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) २५ पर्यवेक्षक यांच्या दोन वर्षाच्या मानधनासाठी २४ हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे एकूण ६ लाख रुपये निधी कोपरगाव तहसीदार यांच्या नावे प्राप्त झाला होता. २६ जून २०२३ रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सदर निधी RTGS द्वारे वरील लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवलाही इथपर्यंत हे प्रकरण ठीक वाटतं. मात्र येथूनच खऱ्या गोंधळाला सुरवात होते.
    मला फक्त तिला भेटायचंय! स्वीडनहून लेक नागपुरात, जन्मदात्रीला शोधण्यासाठी वणवण; माय-लेकीची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
    केलेले सर्व BLO यांची यादी तहसील कार्यलयातील राहुल साहेबराव शिरसाठ या तत्कालीन महसूल अधिकाऱ्याने तयार केली. यादीचं वैशिष्ठं म्हणजे यातील बरेच BLO लाभार्थी हे एकाच कुटुंबातील आहेत. तर एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर २-३ वेळा २४ हजार रुपयांची रक्कम जमा झालेल्या आहेत. काही BLO लाभार्थी गृहिणी आहेत. तर एक BLO लाभार्थी चक्क महिला पोलीस कर्मचारी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी दोनदा मोबदला कधीपासून मिळायला सुरुवात झाली आहे, हे आता लाभार्थी महिला पोलीस कर्मचारी किंवा वरील भ्रष्टाचारीच सांगू शकतील. सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे मात्र सहीचा अधिकार असलेल्या तहसीलदारावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    ऑनलाइन फ्रॉडचा नवा प्रकार, या नंबरपासून सावध राहा; एका चुकीने बसेल मोठा फटका
    उच्च न्यायालयात दाद मागणार
    कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यवेक्षकांचे सहा लाख रुपये नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या नावावर वर्ग केले. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मी माहिती अधिकारात या पैशांचं काय केलं? अशी माहिती विचारली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    रडत रडत नीलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; विखेंविरोधात नगरमधून लोकसभा लढणार

    तहसीलदारांच्या सहीने खाजगी लोकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले गेले हा भ्रष्टाचार आहे. या अनुषंगाने मी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, की या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करावी त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात राहुल शिरसाठ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. मात्र त्याची सही कुठेही नाही. सही तहसीलदारांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा मी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *