• Sun. Nov 10th, 2024

    खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी, १५ तरुण पाण्यात पडले

    खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी, १५ तरुण पाण्यात पडले

    प्रसाद रानडे, अलिबाग : खांदेरी किल्ल्यावरून परतणारी बोट पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी खांदेरी किल्ल्यावरील वेताळाचे दर्शन घेऊन परतणारी बोट समुद्रात पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खवळलेल्या समुद्रातील पाण्यामुळे बोट पलटी झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    कळसूबाईच्या शिखरावर महिलांना प्रवेश बंदीचा फलक; ट्रेकरांकडून नाराजी, महिला आयोगाने घेतली दखल
    अलिबाग तालुक्यातील थळ पासून काही अंतरावर खोल समुद्रात खांदेरी किल्ला आहे. हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून या किल्ल्यात वेताळ देवाचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. साखर – आक्षीमधील काही तरुण रविवारी ३१ मार्च रोजी बोटीतून वेताळ देवाच्या दर्शनासाठी गेले होते.
    मला फक्त तिला भेटायचंय! स्वीडनहून लेक नागपुरात, जन्मदात्रीला शोधण्यासाठी वणवण; माय-लेकीची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
    देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर ते परतीच्या मार्गावर निघाले. किल्ल्यापासून काही अंतरावर गेल्यावर खवळलेल्या समुद्रातील पाण्यामध्ये बोट पलटी झाली. बोट पलटी झाल्यानंतर बोटीतील सुमारे १५ तरुण पाण्यात पडले. मात्र, त्यांनी पोहत किनारा गाठल्याने सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली असल्याची माहिती समोर येत आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed