• Mon. Nov 25th, 2024
    मलाही मंत्रीपद मिळाले असते पण…, सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

    बारामती: लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देताच खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. आज त्यांनी बारामतीत आजवरचं सर्वात आक्रमक भाषण केलं. ते म्हणाल्या की, मला कुणाच्या अश्रूवर माझा महाल बांधायचा नाही. पण आजवर कोणाला तरी दिल्लीत जायचं होतं का? खासदारकीसाठी कोणीतरी तयार होतं का? हा आरोप करतानाच सुप्रिया सुळे यांनी घड्याळाचा किस्सा सांगितला आणि उपस्थितांना प्रश्न विचारला, सांगा आता कुणाच्या तरी हातात घड्याळ दिसतं का?
    इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा निकाल कसा निघेल? पत्रकाराचा शरद पवारांना प्रश्न, पवार म्हणाले…
    खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील कसबा भागात अण्णाभाऊ साठेनगरमध्ये पदयात्रा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपने नेते म्हणतात की त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे. हे तुम्हाला चालणार आहे का? इंग्रज आले आणि देश काबीज केला. तसा महाराष्ट्र भाजपवाले संपवत आहेत. आम्ही अर्धी भाकरी खाऊ पण दुसऱ्याच्या दारात चाकरी करणार नाही. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे महत्त्व कमी करत आहे.सुळे पुढे म्हणाल्या की, मी सरसकट कर्जमाफी मागितली. मात्र उद्योगपतीचे दहा लाख कोटी माफ केले. काँग्रेसने हॉस्पिटल बांधली. या देशातली सगळी कामे काँग्रेसने केली, यांनी काय केले? हे सरकार सातत्याने या संस्था का विकते आहे? लक्षात ठेवा, हे उद्या निवडून आले तर काय करतील? आज आमच्या घरात शिरले, उद्या तुमच्या घरात शिरतील. मलाही मंत्रीपद मिळाले असते, पण वडिलांना सोडून मी नाही गेले. मी लढणार आणि जिंकणारही.

    मी ३० वर्षे ओळखतो, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचं मनोमिलन होणं शक्य नाही : भागवत कराड

    या भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. पण यांना फक्त शरद पवारांना संपवायचे आहे. यांना शरद पवार लागतात कारण आपले नाणे खणखणीत आहे. माझी सगळ्यात मोठी ताकद माझी इमानदारी आहे. जो विकास झाला तो सगळ्यांनी मिळून केला. आता काडीमोड झाला म्हणून काय झालं जे खरं आहे ते खरं आहे. आणि ते खरं बोललं पाहिजे. बारामतीमध्ये दमदाटी केली जात आहे. मात्र कुणीही दमदाटीला घाबरू नका. इथे दमदाटी चालणार नाही. मी कुणाला दम देत नाही आणि कोणाचा दम ऐकून घेत नाही, असे त्या आक्रमकपणे म्हणाल्या.

    आजपर्यंत कुणाला दिल्लीला जायचं होतं का? खासदारकी मी सोडून कुणालातरी लढायची होती का? कुणीतरी म्हणाले का, की मला खासदार व्हायचं आहे? सगळ्यांना विचारलं होतं. तेव्हा कुणाला जायचं नव्हते. मग १८ वर्ष मी काम चांगले काम केलं आहे. तर ती खासदारकी कुणाला मिळायला पाहिजे? आज कुणाच्या तरी हातात घड्याळ दिसतं का? कारण मोबाईलमध्ये घड्याळ दिसते. माझा मुलगा मला म्हणाला, आई मला घड्याळ नको, कारण घड्याळ मोबाईलमध्ये पण आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed