• Mon. Nov 25th, 2024
    ‘मेफेड्रोन’ प्रकरणात दोन संशयितांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकरोड परिसरातून एमडी (मेफेड्रोन) हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी आता गंजमाळ भागात कारवाई करून दोन संशयितांना अटक केली. फारुख सलीम शेख (वय ३३, रा. गंजमाळ) व महेश उर्फ नाना दत्तात्रय शिरोळे (४८, रा. इगतपुरी) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी ठाणे येथून एमडी खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी विक्रीसाठी नव्हे तर नशेकरीता ते आणल्याचे पोलिसांना सांगितले.गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित ‘एमडी’सह गंजमाळ भागात असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सापळा रचण्याचे निर्देश दिले. त्यान्वये, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार रमेश कोळी, देविदास ठाकरे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अनुजा येवले यांनी सापळा रचला.
    सासरच्यांकडून छळ; फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी, माजी नगरसेविकेच्या सुनेचा टोकाचा निर्णय
    दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी ठाण्यातून एमडी खरेदी केल्याची कबुली दिली. दरम्यान, विक्री करण्यासाठी नव्हे, तर नशा करण्यासाठी एमडी खरेदी केल्याचा दावा त्यांनी पोलिस चौकशीत केला. दोघांवर यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत. नाशिक न्यायालयाने त्यांना दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयितांवर भद्रकाली पोलिसांत गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.

    संशयित बेरोजगार आहेत. भद्रकाली परिसरात त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यातून त्यांनी एमडी खरेदीसाठी ठाणे गाठले. त्यांचे इतर व्यवहार आणि एमडी खरेदीतल्या संशयितांचा शोध घेत आहोत.

    – वसंत पवार, सहायक पोलिस निरीक्षक, भद्रकाली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed