धुळे: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आपल्या ११ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचितने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी दलित आणि मुस्लिमांचे मते खेचण्याची रणनीती आखली आहे. जर दोन्ही समुदायांची मते खेचण्यात वंचितला यश आले तर भाजपची डोकेदुखी वाढू शकते, की महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी धुळ्यात एसपी म्हणून काम पाहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे धुळे शहरात येणे-जाणे वाढले होते. शिवाय, त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमही धुळ्यातच झाला होता. तेव्हापासून अब्दुल रहमान लोकसभा निवडणूक लढवतील, असा कयास होता, तो अखेर खरा ठरला आहे. आता ते वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभेचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.केंद्राने सीएए आणि एनआरसी लागू करण्याच्या हालचाली तीव्र करताच तेव्हाचे विशेष महानिरीक्षक अब्दुल रहमान यांनी आपला राजीनामा केंद्राकडे सुपूर्द केला होता. तेव्हा या राजीनाम्याने देशभरात खळबळ उडवून दिली होती. सेवामुक्त झाल्यापासून अब्दुल रहमान यांनी केंद्राच्या विरोधात आपली तोफ धडाडत ठेवली होती. म्हणून त्यावेळेस माझी आयपीएस अब्दुल रहमान हे चांगलेच प्रकाश झोतात आले होते. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने नबी अहमद यांनी ३९ हजार ४४९ मते खेचली होती. सध्या स्थितीत धुळे लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रापैकी धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या एक लाखाच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ देखील मुस्लिम बहुल असून तेथे २ लाख ९६ हजार इतक्या मतदारांची नोंद आहे. म्हणजेच धुळे शहर आणि मालेगाव (मध्य) याठिकाणी मुस्लिम मते तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ८३ हजार ७२३ मतदार असून यात दलित मतांचे प्रमाण साधारत १ लाख ९० हजार इतकी मते होतात. म्हणजेच मुस्लिमांचे २ लाख आणि दलितांची १ ते २ लाख मते खेचण्यात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यशस्वी झाल्यास भाजपचे खा. डॉ. सुभाष भामरेंसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते आणि महाविकास आघाडीला फटका बसू शकतो यात शंका नाही.