• Mon. Nov 25th, 2024

    खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना डिवचलं, ६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

    खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना डिवचलं, ६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

    पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण सांगावं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मी समोरासमोर बोलायला तयार असल्याचं चॅलेंजही रोहित पवारांनी केलं आहे.

    आज (ता. १ एप्रिल) पुण्यात रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आरोग्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जळजळीत टीका केली आहे.

    रोहित पवार म्हणाले, “निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हिजी आणि सुमित कंपनी, या कंपन्यांवर मेहरबानी दाखवली जात आहे. आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये सुमारे ६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. नियम आणि टेंडर डिझाईन करून कसे वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. हा लढा सामान्य व्यक्तीचा आहे. आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी हा घोटाळा केला असून या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री सावंतांनी हा घोटाळा केला असून त्यांनी राज्याला भिकारी केलं आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
    जे व्हायचं होतं ते झालं आता २०२९ मध्ये बोलू; काँग्रेससोबत सांगलीच्या वादावर उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर
    रोहित पवारांनी पुढे बोलताना रुग्णवाहिका खरेदी घोटाळा कसा झाला याची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, “स्वच्छता काम टेंडरमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढवले गेले. राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी स्पॅनिश कंपनी यांना टेंडर दिले गेले होते. त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता. टेंडर हे सुमित कंपनी यांनी डिझाईन केला आणि त्यांनाच मिळाले. त्यांना स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसतानाही नियमबाह्य पद्धतीने त्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले. तेव्हा, त्यांच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या बीव्हिजी कंपनीलाही नाराज न करता त्यांना देखील टेंडरमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे.” सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोला त्यांनी लगावला.

    दरम्यान, तानाजी सावंत यांनी ” खेकड्याने पोखरल्याने धरणांना गळतीलागते” असे विधान केले होते, या विधानावरून रोहित पवारांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावत सावंतांना डिवचले. आता पवारांच्या आरोपावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत काय स्पष्टीकरण देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *