• Mon. Nov 25th, 2024
    नाते टिकवण्यासाठी ‘त्रिसूत्री’ गरजेची; विवाह समुपदेशकांचा सल्ला, जाणून घ्या ही त्रिसूत्री

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : पती-पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या कुरबुरी थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याने हे नाते टिकवण्यासाठी दोघांची आणि त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आई-वडिलांनी नव्या दाम्पत्याला त्यांचे नाते विस्तारण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य द्यावे. तर दोघांच्या नात्यात ‘कनेक्टीव्हीटी, कम्युनिकेशन आणि कमीटमेंट’ ही त्रिसूत्री त्यांचे नाते टिकवून ठेवण्यासाठी गरजेची असल्याचे मत प्रसिद्ध विवाह समुपदेशक डॉ. गौरी कानिटकर यांनी मांडले. ‘मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’ व ‘मनोदय ट्रस्ट’च्या वतीने ‘नांदू या सौख्यभरे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहजीवनाची परिभाषा शिकून आपले नाते कसे टिकवावे आणि त्यात अखेरपर्यंत गोडवा कसा आणावा, यासाठी कानिटकर आणि डॉ. अद्वैत पाध्ये यांनी अनेक खुसखुशीत दाखले देत मार्गदर्शन केले.कानिटकर यांची मुलाखत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पाध्ये यांनी घेतली. लग्न संस्था आणि लिव्ह अँड रिलेशनशीप यातील फरक आणि गरज पटवून देत पालकांनी लग्न संस्काराची गरज मुलांना पटवून द्यावी, त्याचबरोबर लैंगिक शिक्षण घरातून दिले जाणे आवश्यक असल्याचे सांगताना, लग्नाच्या वयात आलेल्या अनेक मुला-मुलीना लैगिक शिक्षण नसल्याने त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात.
    प्रवाशांची STच्या मोबाइल तिकिटांना पसंती, विक्रीत इतक्या टक्क्यांनी वाढ; तब्बल ११ कोटींचा महसूल गोळा
    मात्र, जोडीदार त्या मानाने मनाने तयार नसतो. यामुळेच त्यांचे नाते पुढे जाण्याऐवजी त्यात दुरावा येत असल्याचे अनुभव त्यांनी मांडले. यासाठी तिचा प्रवास मनापासून शरीराकडे, तर त्याचा प्रवास शरीराकडून मनाकडे जात असतो. यामुळेच तिला त्याने समजून घेत तिच्या क्लेने नाते फुलविणे जितके गरजेचे आहे, तितकेच तिने त्या नात्यात गोडवा निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

    कोणत्याही मुलाला किंवा मुलीला मिळणारा नकार हा तिच्या त्याच्या दिसण्यामुळे नसून, मनातील प्रतिमेशी सांगड घातली जात नसल्यानेच दिला जातो हे समजून घ्या, भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी प्रत्येक बाबींवर सुरुवातीलाच चर्चा करा. दोघांच्याही आवडी निवडींना योग्य सन्मान देता आला, तर नाते टिकवण्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत. त्याचबरोबर मित्र-मैत्रिणी परिघाबाहेर ठेवणे हे देखील लग्न टिकविण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed