• Mon. Nov 25th, 2024
    नाना पटोलेंचं भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावर आलं आहे – प्रकाश आंबेडकर

    अकोला: नागपूरच्या बाबतीत आपला उमेदवार जिंकतो आहे, या आनंदापेक्षा नितीन गडकरी पराभूत होत आहेत, याचे दुःख नाना पटोले यांना अधिक आहे. पटोले यांना भंडारा-गोंदियाचे तिकीट मिळत असतानाही त्यांनी नाकारले. याचा अर्थच त्यांना भाजपला मदत करायची आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसची उमेदवारी देताना भाजपला कशी मदत करता येईल, असा विचार झालेला दिसतो आहे. लोकसभा मतदारसंघांतील जागा वाटपावरून तरी लक्षात हे येत आहे. काँग्रेसचे काही नेते भाजपला आतून मदत करत आहेत. आठवड्यातून तीनदा उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्या उमेदवाराला काँग्रेसने तिकीट दिले. याचा अर्थ अशोक चव्हाण यांची नाना पटोले यांच्याशी कशी जवळीक आहे हे सिद्ध होते. आम्ही काँग्रेसला नागपूर आणि कोल्हापूर येथे पाठिंबा दिला आहे. उर्वरित जागेवर त्यांनी उमेदवारांची नावे सांगितल्यावर त्यांना पाठिंबा देऊ किंवा तसा विचार केला जाईल, असेही आंबेडकर म्हणाले.
    बुलढाण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? हर्षवर्धन सपकाळांच्या ट्विटने खळबळ, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत
    नाना पटोले यांचे भाजपसोबत छुपे संबंध आहेत. वंचितला महाविकास आघाडीत घेऊ नये, यासाठी नाना पटोले प्रयत्न करत होते. आज नाना पटोलेंच्या आयुष्यातला दुर्दैवी दिवस आहे. सात जागांचा पाठिंबा द्यायचे पत्र दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनं २ मतदारसंघाचा पाठिंबा मागितला. कोल्हापूर आणि नागपूर असे दोन मतदारसंघ होते. या दोन्ही ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. उद्या आमच्या पाठिंबामुळे कोण जिंकणार तो भाग वेगळा असणार. पण आजच्या पत्रकार परिषदेतून सांगतोय नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार. याच्याबद्दल प्रचंड दुःख झालं. म्हणून त्यांनी आरोप केला की वंचितनं म्हणजेच ‘आम्ही’ जो पाठिंबा दिला तो गडकरींना हरविण्यासाठी दिला, हा आरोप पटोलेंचा आहे. दरम्यान नाना पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेला संबंध यातून उघड झाले.

    प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, दरम्यान काँग्रेसमध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे स्पष्ट झालं. नाना पटोले यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे. तसेच वंचितला मविआत का घेऊ नये? वारंवार नाना पटोलेंकडून वक्तव्य होतं होतं. आता त्यावरून स्पष्ट होतं की वंचितनं महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असता तर भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला असता. तेच नाना पटोलेंना नको होतं. त्यामुळे वंचितला बाहेर ठेवण्यात आलं, असा थेट आरोप त्यांनी नाना पटोलेंवर केला आहे.

    विजय करंजकरांच्या नाराजीवर काय म्हणाले राजाभाऊ वाजे?

    दरम्यान आता मविआसोबत बोलणी थांबली आहे. काँग्रेसला दिलेल्या पत्रानुसार अधिक मतदारसंघासाठी पाठिंबा मागणी आली तर कदाचित देऊ. दिलेला शब्द पाळला जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजपचा पराभव करणे हेच आमचे लक्ष आहे. आज नाना पटोले यांनी जे उमेदवार जाहीर केले. दुर्दैवाने बोलावे लागते नांदेडचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठवड्यातून तीनदा डायलिसीसवर. ते फिरू शकत नाहीत. नांदेडमध्ये नाना पटोलेंची अशोक चव्हाणांसोबत मॅच फिक्सिंग. आमचा नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नाही, असेही ते स्पष्टच बोलले. दरम्यान आज काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा भाजपच्या नेत्यांशी छुपा संबंध आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गांभिर्याने पाहावं, असा आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *