-उमेदवार अंतिम झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
-नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी २८ मार्च रोजी करण्यात आली. त्यात २६ उमेदवारांचे अर्ज वैध तर २७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते.
-रामटेक लोकसभा मतदारसंघातून ३५ उमेदवार वैध तर ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते.
-एका ईव्हीएमवर १६ उमेदवारांची नावे असतात त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम लागणार आहेत.
-निवडणूक शाखेला अतिरिक्त ईव्हीएमची व्यवस्था करावी लागते. मतदान केंद्राच्या २२५ टक्के म्हणजे १० हजार १४७ बॅलेट युनिट तयार ठेवाव्या लागणार आहेत.
-कंट्रोल युनिट ५ हजार ६३७ आणि व्हीव्हीपॅट ६ हजार ८८ लागणार आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघ
नितीन गडकरी : भारती जनता पार्टी : कमळ
विकास ठाकरे : इंडियन नॅशनल काँग्रेस : पंजा
योगीराज ऊर्फ योगेश पतीराम लांजेवार : बहुजन समाज पार्टी : हत्ती
किवीनसुका सूर्यवंशी : देश जनहित पार्टी : शाळेचे दप्तर
गरुदाद्री आनंद कुमार : अखिल भारतीय परिवार पार्टी : किटली
गुणवंत सोमकुवर : भारतीय जवान किसान पार्टी : गॅस सिलिंडर
टेकराज बेलखोडे : बहुजन मुक्ती पार्टी : खाट
दीपक मस्के : बहुजन महा पार्टी : सिटी
नारायण चौधरी : सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट : बॅटरी टॉर्च
फहीम शमीम खान : माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी : क्रेन
विजय मानकर : आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया : कोट
विशेष फुटाणे : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी : कपाट
श्रीधर साळवे : भीमसेना : ऑटोरिक्षा
सुनील वानखेडे : राष्ट्र समर्पण पार्टी : हेल्मेट
सूरज मिश्रा : कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी : हिरा
ॲड. संतोष लांजेवार : ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॅाक : सिंह
आदर्श ठाकूर : अपक्ष : ट्रक
ॲड. उल्हास दुपारे : अपक्ष : दूरदर्शन
धानू वलथरे : अपक्ष : मनुष्य व शिडयुक्त नाव
प्रफुल्ल भांगे : अपक्ष : पेट्रोलपंप
बबिता अवस्थी : अपक्ष : गॅस शेगडी
विनायक अवचट : अपक्ष : टिलर
सचिन वाघाडे : अपक्ष : रोडरोलर
साहील तुरकर : अपक्ष : बिस्किट
सुशील पाटील : अपक्ष : एअरकंडीश्नर
संतोष चव्हाण : अपक्ष : पाटी
रामटेक लोकसभा मतदारसंघ
राजू पारवे : शिवसेना : धनुष्यबाण
श्यामकुमार बर्वे : काँग्रेस : हात
संदीप मेश्राम : बसप : हत्ती
आशिष सरोदे : भीमसेना : ऑटोरिक्षा
उमेश खडसे : राष्ट्र समर्पण पार्टी : हेल्मेट
मंजुषा गायकवाड : अखिल भारतीय परिवार पार्टी : किटली
गोवर्धन कुंभारे : वीरो के वीर इंडियन पार्टी : हिरा
प्रमोद खोब्रागडे : आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया : कोट
भीमराव शेंडे : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी : शिट्टी
भोजराज सरोदे : जय विदर्भ पार्टी : रूम कुलर
रिद्धेश्वर बेले : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) : शिलाई मशिन
रोशनी गजभिये : गोंडवाना गणतंत्र पार्टी : करवत
शंकर चहांदे : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलिंडर
सिद्धार्थ पाटील : पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) : फळा
संजय बोरकर : महाराष्ट्र विकास आघाडी : रोड रोलर
संविधान लोखंडे : बळीराजा पार्टी : ऊस शेतकरी
अजय चव्हाण : अपक्ष : पेनाची निब ७ किरणांसह
अरविंद तांडेकर : अपक्ष : कपाट
अॅड. उल्हास दुपारे : अपक्ष : एअरकंडिश्नर
कार्तिक ढोके : अपक्ष : सीसीटीव्ही कॅमेरा
किशोर गजभिये : अपक्ष : प्रेशर कुकर
गोवर्धन सोमदेवे : अपक्ष : दूरदर्शन
प्रेमकुमार गजभारे : अपक्ष : जहाज
सुरेश लारोकर : अपक्ष : बॅट
विलास झोडापे : अपक्ष : फलंदाज
विलास खडसे : अपक्ष : खाट
सुनील साळवे : अपक्ष : कात्री
सुभाष लोखंडे : अपक्ष : पत्रपेटी
रामटेकमधून यांनी घेतली माघार
गौरव गायगवळी
दर्शनी धवड
नरेश बर्वे
प्रकाश कटारे
डॉ. विनोद रंगारी
सुरेश साखरे
संदीप गायकवाड