भास्कर भगरे कोण आहेत?
भास्कर भगरे हे शरद पवारांच्या विश्वासातील दिंडोरीतील राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. भगरे हे पेशाने शिक्षक आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भास्कर भगरे यांनी अनेक आंदोलन केली आहेत. श्रीराम शेटे यांच्या मर्जीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपैकी भास्कर भगरे हे एक आहेत. भास्कर भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. खेडगाव येथील जिल्हा परिषदेतून त्यांनी अनेक विकास काम केली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दिंडोरीतील अनेक नेते हे भास्कर भगरे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी मागणी करत होते.
भास्कर भगरे यांच्या नावाची स्थानिक स्तरातूनच चर्चा शरद पवारांपर्यंत पोहोचली. अखेर तालुका अध्यक्ष पदाचा अनुभव, जिल्हा परिषदेत केलेले कामे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली आंदोलन यातून भास्कर भगरे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व तालुक्यात उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे दिंडोरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उत्साहाचं वातावरण आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे भास्कर भगरे यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला दिंडोरी लोकसभेत मिळू शकतो. दिंडोरीतील कांदा, ऊस, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भास्कर भगरे यांच्या नेतृत्वात मोठे शेतकरी आंदोलन देखील झाली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चर्चा ही संपूर्ण जिल्हाभर होती आणि अखेर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारती पवार तर महाविकास आघाडी करून भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ही लढत तुल्यबळ होईल अशी स्थिती चर्चा सुरू आहे. भगरे विरुद्ध पवार या लढतीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगारांचे प्रश्न यावर मात्र चांगलेच राजकारण ताकणार असे चित्र आता पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्राची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी पाच जणांची नावे जाहीर झालेली आहेत. ती खालीलप्रमाणे…
उमेदवारांची नावे
भास्कर भगरे – दिंडोरी
सुप्रिया सुळे – बारामती
अमोल कोल्हे – शिरूर
निलेश लंके – अहमदनगर
अमर काळे – वर्धा