• Mon. Nov 25th, 2024

    तरुण बसची वाट पाहत होता, तेव्हढ्यात दुचाकीवरुन दोघे आले, नंतर जे घडलं त्यानं परिसर हादरला

    तरुण बसची वाट पाहत होता, तेव्हढ्यात दुचाकीवरुन दोघे आले, नंतर जे घडलं त्यानं परिसर हादरला

    नवी मुंबई: वाशीतील जुहूगाव येथे बसची वाट पाहत बसलेल्या एका तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्राने हल्ला करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर देखील हल्लेखोरांनी शस्राने प्राणघातक हल्ला करुन मोटारसायकलवरुन पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोराविरोधात हत्या तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
    रश्मी बर्वेंची याचिका तातडीने ऐकण्यास न्यायालयाचा नकार, १ एप्रिलला बाजू मांडण्याचे न्यायालयाकडून स्पष्टीकरण
    मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव मुकेश उर्फ मंटु कुमार यादव (२६) असे असून तो कोपरखैरणे येथे राहत होता. तसेच तो वाशी जुहूगाव येथील कपिल किनारा या बारमध्ये काम करत होता. बारमधील काम संपवून मंटु कुमार यादव हा कोपरखैरणे येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यासाठी तो पावणे पाच वाजण्याच्या सुमारास फिजिक्स जिमच्या बिल्डिंगमधील तळमजल्यावरील ओम सिद्धिविनायक होमीयोपेथी दुकानाच्या कट्ट्यावर बसची वाट पाहत बसला होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मंटु कुमार यादव याच्या हातामधील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला.मात्र मुकेशने त्याला विरोध केल्याने सदर हल्लेखोराने मंटु कुमार यादव सोबत झटापट केली. याच वेळी दुसऱ्या हल्लेखोराने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्राने मंटु कुमार यादव याच्या छातीवर तसेच कपाळावर आणि हातावर वार केले. यावेळी मंटु कुमार यादव याची आरडाओरड ऐकून जुहू गावात राहणारा दिनेश जगदीश यादव (४१) हा हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेला असता सदर हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील शस्त्राने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघेही हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले.

    रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी

    या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मंटु कुमार आणि दिनेश या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र मंटु कुमारचा रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झाला. या हत्येच्या घटनेनंतर वाशी पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्या, तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. झालेल्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असल्याचे झोन वन चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed