• Sat. Sep 21st, 2024
बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?

अकोला : अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घातला. अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चू कडू जात असतानाच उगवा फाट्यावर महिलांनी त्यांना थांबविले. “आमच्या प्रश्नाचे निराकरण करा, बच्चू भाऊ”, अशी मागणी माहिलांनी घातली. “आता अकोल्याचा पालकमंत्री नसलो तरी तुमच्यासाठी प्रयत्न करतो”, असं आश्वासन महिलांना दिलं. त्यानंतर थेट अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना फोन केला. ”आज खांबोरा गावाची परिस्थिती बिकट आहे. या गावात भीषण पाणीटंचाई आहे. एक महिना होतो आहे. पिण्यासाठी पाणी नाहीये. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करावे”, अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.”पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ यंत्रणा हलवणे गरजेचेचं आहे. जिल्हा परिषदकडून प्रस्ताव बोलवा, पिण्याचे पाणी येत नसेल तर हे दुर्दैवी आहे, चुकीचं आहे”, अशा शब्दात बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हटले आहे. ”कलेक्टर.. तूमच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीयत. आपण तात्काळ तहसीलदार, बीडीओंना, सीईओंकडून प्रस्ताव मागवून घ्या. आणि त्यावर विचार करावा. आज एक महिना झाला खांबोरा गावात पाणी नाहीये. बाकीचे बिसलरीचं पाणी पित आहे”, असंही बच्चू भाऊंनी जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं.
राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ठाकरेंकडून उमेदवारी, पवार गटाच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

दरम्यान, या घेराव घालणाऱ्या सर्व महिला अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातले खांबोरा गावातल्या आहेत. या गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र तोडगा निघाला नाहीये, अशा शब्दात महिला बच्चू कडूंना सांगत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed