प्रकाश आंबेडकर यांच्याकडून संजय राऊत आणि मविआवर प्रश्नांचा भडिमार
संजय आणखी किती खोटं बोलणार… तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये ६ मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? तुम्ही मित्रपक्ष होऊन पाठीत खंजीर खुपसला आहे.
सिल्व्हर ओक्स येथील बैठकीमध्ये तुम्ही काय भूमिका घेतली होती, हे आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे युती करत आहात? एकीकडे युतीचा आभास दाखवून दुसरीकडे आम्हाला पाडण्याची कारस्थाने आपण करत आहेत. हे तुमचे विचार आहेत? अशा प्रश्नांचा भडीमार आंबेडकर यांनी केला.
आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर बोलणे टाळले, प्रश्नांना उत्तरेच दिली नाहीत
प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पहाटे मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी थेट उमेदवारांची यादीच जाहीर केली. यावेळी आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल काही बोलतील, अशी आशा होती. त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील उलगडला. वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, महाविकास आघाडीविषयी बोलण्याचे टाळले. या विषयावरील प्रश्नांनाही पत्रकार परिषदेत उत्तरे दिली नाही.