• Sat. Sep 21st, 2024
यवतमाळ जिल्ह्यात खळबळजनक घटना! नेपाळी युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : राळेगावात सोमवारी एका नेपाळी युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साहेबराव मारोती चव्हाण याला अटक केली आहे.
निम्म्या विदर्भाने केली चाळीशी पार, विदर्भाच्या ‘या’ भागात सर्वाधिक तापमानाची नोंद
अर्जुनसिंग असे या घटनेतील मृताचे नाव आहे. हा मूळचा नेपाळमधील असून काही दिवसांपासून राळेगावातील चायनीज सेंटरवर कामाला होता. सोमवारी दुपारी प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्धवट सभागृहाच्या भिंतीला लागून एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला. माहिती मिळताच राळेगाव पोलिस घटनास्थळी आले. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्याची ओळख पटविली असता अर्जुनसिंग असल्याचे स्पष्ट झाले.पैशांवरून अर्जुनसिंगचे गावातील साहेबराव चव्हाण याच्याशी वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी साहेबराव याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ‘अर्जुनसिंग याच्याशी पैशांवरून काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी २५ मार्च रोजी प्रशासकीय इमारतीच्या मागे दुपारी अर्जुनसिंग याचा दगडाने ठेचून खून केला,’ अशी कबुली दिली. राळेगाव पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून साहेबराव याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोल्हे व पथकाने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed