• Mon. Nov 25th, 2024

    पाण्याचा अंदान न आल्याने तरुणाचा मृत्यू, गावावर शोककळा, नागपूर उच्च न्यायालयात होता कार्यरत

    पाण्याचा अंदान न आल्याने तरुणाचा मृत्यू, गावावर शोककळा, नागपूर उच्च न्यायालयात होता कार्यरत

    बुलढाणा : होळी म्हटली की विशेषता ग्रामीण भागात गावापासून जवळच असलेल्या नदी मध्ये जाऊन किंवा मोठ्या घराच्या विहिरीमध्ये डुबक्या मारून रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतला जातो. वर्षातून एकदाच येणारा हा रंग उधळणाचा सण अनेकवेळा जीवावर देखील बेततो. असाच काहीचा प्रकार बुलढाणा येथील एका युवकासोबत घडला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पुन्हा एकदा रंगाच्या सणांमध्ये भंग झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील युवा विधिज्ञ तथा नागपूर उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या २४ वर्षीय युवकाचा नळगंगा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत पोहोण्यासाठी आलेल्या या युवकाचा पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नळगंगा धरणात उघडीस आली.
    जानकर महायुतीकडून या ‘तीन’ ठिकाणी ठरू शकतात गेमचेंजर

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आलोखसिंग दिनेशसिंग ठाकुर (वय २४, रा. काळीपुरा मलकापूर) हा आपल्या मित्रांसोबत पोहोण्यासाठी नळगंगा धरणात गेला होता. सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पोहोताना आलोखसिंग हा धरणात खोलवर गेल्याने पोहोताना पाण्यात बुडाला. दरम्यान, स्थानिक मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या मदतीने रात्री ८ वाजेपर्यंत आलोखसिंगचा नळगंगा धरणात शोध घेण्यात आला. परंतू तो मिळून आला नाही.

    आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नळगंगा धरण परिसरात असलेल्या विहिरीजवळ आलोखसिंगचा मृतदेह आढळून आला. याबाबत दिनेशसिंग निरंजनसिंग ठाकूर (वय ४८, रा. काळीपुरा मलकापूर) यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल खराडे करत आहे.

    चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते. ज्या ठिकाणी पाणी पातळी आठ ते दहा फूट इतकी आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू पाण्यात बुडाल्यावर झटके आल्याने झाला असावा, असा अंदाज आहे. तर अलोकसिंहच्या अकाली मृत्यूने त्याच्या मित्रांना हादरा बसला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed