• Sat. Sep 21st, 2024
अनुप धोत्रेंच्या विरोधात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, जाणून घ्या कोण आहेत प्रमोद पोहरे?

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजप कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाही नको, असे जाहीर सांगत असतानाही अकोल्यात नेमके तेच घडले, असा आरोप पोहरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी होती-आहे दादांच्या मनात, आढळराव पाटलांच्या मनगटावर घड्याळ, अमोल कोल्हे यांना टक्कर देणार!
मागील २५ वर्षांपासून अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. खासदार संजय धोत्रे या मतदारसंघात सलग चार वेळा निवडून आलेले आहेत. सध्या प्रकृतीच्या कारणाने राजकारणात सक्रिय नसल्याने अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना देण्यात आली आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट न झाल्याने अॅड. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढणार हे निश्चित मानले जात आहे. काँग्रेस नेमकी कुणाला उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. हे सारे घडत असताना भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे निर्माण झाली आहेत.पोहरे म्हणाले, अकोल्यामध्ये २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या नेत्यांच्या घरी पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अनुप धोत्रे भाजपमध्ये सक्रिय नाहीत. त्यांनी पक्षासाठी कुठेलेही काम केले नाही. एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती. त्यामुळे भाजपने अनुप धोत्रे यांची उमेदवारी मागे घ्यावी अन्यथा मी स्वतः अपक्ष म्हणून धोत्रे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याकरिता उभा राहणार, असेही पोहरे यांनी म्हटले आहे.

धारावीची पारंपरिक होळी; राहुल शेवाळेंचं कोळी वेशभूषेत नृत्य, पालखी नाचवत केली धम्माल

कोण आहेत प्रमोद पोहरे?

प्रमोद पोहरे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात पक्षासाठी त्यांनी बरीच कामे केली आहेत. विदर्भ एसटी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed