• Mon. Nov 25th, 2024
    सततच्या खोदकामांमुळे पुणेकरांना मनःस्ताप, डांबरीकरण झालेले रस्ते पुन्हा खोदले, नागरिकांची अडचण

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांसाठी लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता यांसह शहराच्या बहुतेक सगळ्याच भागांत खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यापैकी अनेक रस्त्यांवर काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण झाले असताना, या रस्त्यांवर पुन्हा खोदकाम केले जात असल्याने महापालिकेच्या विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. कर्वे रस्त्यावरील खोदकाम नेमके कशासाठी सुरू आहे, याचा थांगपत्ता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नाही.
    विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन, शाळांमध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना
    करोनाकाळात लॉकडाउनचा फायदा घेऊन पालिकेने मध्यवर्ती पेठांमध्ये जल व मलवाहिन्या टाकण्याचे काम केले. यानंतर आता पुन्हा एकदा लक्ष्मी रस्त्यावर मलवाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात आल्याने जवळपास अर्धा रस्ता बंद झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता लक्ष्मी रस्त्यावर बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या नागरिकांना बस येणार की नाही, याचीच माहिती नाही. लक्ष्मी रस्त्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेला शिवाजी रस्ता पुन्हा खणला आहे. फडगेट पोलिस चौकीजवळ समान पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले आहे. कर्वे रस्त्यावर सह्याद्री हॉस्पिटलजवळ नेमके कशासाठी खोदकाम सुरू आहे, याची माहिती घ्यावी लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सर्व ठिकाणचे खोदकाम परवानगी घेऊनच केले जात आहे. नागरिकांच्या माहितीसाठी कामाच्या ठिकाणी फलक लावले नसल्यास तशा सूचना तातडीने दिल्या जातील.
    – अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुख, पुणे महापालिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *