• Sat. Sep 21st, 2024

राज्यात २३ खासदार; भाजपकडून २२ जागांवर उमेदवार; एका मतदारसंघात अडतंय; काय घडतंय?

राज्यात २३ खासदार; भाजपकडून २२ जागांवर उमेदवार; एका मतदारसंघात अडतंय; काय घडतंय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप तरी जाहीर झालेलं नाही. भाजपनं सर्वाधिक २३ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या. पैकी २३ जागा भाजपनं जिंकल्या. या २३ पैकी २२ जागांवर भाजपनं उमेदवारांची घोषणा केली आहे.

विद्यमान खासदारांच्या जागांचा विचार केल्यास भाजपनं उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत भाजपचे एकूण ३ खासदार आहेत. त्यातील २ खासदारांचा पत्ता कट झाला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे.
लोकसभेला एकही सीट नाही, पण अमित ठाकरेंना ‘सेट’ करणार; भाजपकडून राज यांना नवा प्रस्ताव?
शेट्टी, कोटेचा यांच्यानंतर पूनम महाजन यांचाही पत्ता कट होऊ शकतो. त्यांच्या जागी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. महाजन यांच्या मतदारसंघात विधानसभेच्या ६ जागा आहेत. आशिष शेलार यांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेशही उत्तर मध्य मुंबईत होतो. शेलार २०१४ पासून वांद्रे पश्चिममधून निवडून येत आहेत. दोन्ही वेळा ते २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यामुळे महाजनांच्या जागी शेलार यांना संधी दिली जाऊ शकते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली. तेव्हापासून शेलार सातत्यानं उद्धव ठाकरेंना शिंगावर घेण्याचं काम करत आहेत.
शिंदेंच्या हातून शिवसेना जाणार? भाजपचा धडकी भरवणारा प्रस्ताव; राजकीय कारकीर्द संपण्याची भीती
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस देणार स्टार उमेदवार?
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ २००४ ते २०१४ या कालावधीत काँग्रेसकडे होता. २००४ मध्ये इथून एकनाथ गायकवाड, तर २००९ मध्ये प्रिया दत्त निवडून आल्या. पण गेल्या निवडणुकांमध्ये दत्त इथून पराभूत झाल्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं या मतदारसंघातून राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed