• Sat. Sep 21st, 2024

संघाची शपथ, संविधान बदलण्याचा डाव, सगळ्याचा रेकॉर्ड; आंबेडकरांनी एक-एक करुन सगळंच सांगितलं

संघाची शपथ, संविधान बदलण्याचा डाव, सगळ्याचा रेकॉर्ड; आंबेडकरांनी एक-एक करुन सगळंच सांगितलं

मुंबई: देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान बदलण्यासाठीच लागतात, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १९५० मध्येच घेतली असल्याचंही ते म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा, त्यांच्याकडून देण्यात आलेली ४ जागांची ऑफर, भाजपची ४०० पारची घोषणा यावर सविस्तर भाष्य केलं.

२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या बाजूनं वातावरण होतं. युफोरिया होता. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच त्यांना नेत्यांची पळवापळवी करावी लागतेय, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी भाजपचा समाचार घेतला. संविधान बदलण्यासाठीच ४०० जागा गरजेच्या असतात. सरकार चालवण्यासाठी ३०० जागादेखील पुरेशा असतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला
काय बदलायचं, काय बदलायचं नाही ते सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे. पण मला १९५० मध्ये आरएसएसनं घेतलेली शपथ आजही आठवते. आम्हाला संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली होती. त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला ४ जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. मविआनं २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावं. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार्चला मी अकोल्यातून निवडणूक अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली.
सेनेच्या ४ खासदारांचा पत्ता कट? शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव; मुख्यमंत्री काय करणार?
काँग्रेसला ७ जागांसाठी आम्ही दिलेली ऑफर कायम आहे. काँग्रेसनं आम्हाला ७ जागांची यादी द्यावी. आमच्यामुळे मदत होईल. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसनं आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू, असं आंबेडकर म्हणाले. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस यांच्यात काही जागांवरुन गोंधळ आहे. काही ठिकाणी ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत, याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता आमच्यामुळे तरी मविआमध्ये कोणताही गोंधळ नाही. जागावाटपात आमत्यामुळे कोणतीही बाधा आलेली नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed