• Sat. Sep 21st, 2024
एआय, एमएलचे शिक्षण घ्या! ‘एनईटीएफ’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘भारतातील युवापिढीला संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच वारशाला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, क्वांटम कम्प्युटिंगचे शिक्षण घेऊन पुढील वाटचाल करावी,’ असा सल्ला ‘नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शनिवारी दिला.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे’चा (ट्रिपल आयटी पुणे) पहिल्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. या वेळी संचालक डॉ. ओ. जी. काकडे, कुलसचिव डॉ. मुकेश नंदनवार, डॉ. चंद्रकांत गुळेद, डॉ. संजीव कुमार, डॉ. सुशांतकुमार आदी उपस्थित होते. या समारंभात ३३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात करण्यात आले.

‘पदवी प्रदान समारंभ संस्थेसाठी महत्त्वाचा मैलाचा दगड असतो. तंत्रशिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टता विकसित करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आयआयआयटी पुणे या संस्थेचा पहिला पदवी प्रदान समारंभ हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा समारंभ विद्यार्थ्यांना सक्षम शैक्षणिक आधार आणि सतत विकसित होत असलेल्या तांत्रिक वातावरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांची समाजाची प्रगती आणि परिवर्तनात महत्त्वाची भूमिका राहणार आहे. यश केवळ वैयक्तिक कर्तृत्व किंवा भौतिक संपत्तीबद्दल नाही, तर ते आपल्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी देखील आहे,’ असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
मुंबईतील क्षयरुग्ण घटले! वेळेवर निदानासाठी एआय एक्सरे सेवेचा वापर, काय सांगते आकडेवारी?
‘शिक्षक, उद्योग भागीदार, राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे ट्रिपल आयटी, पुणे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. आगामी काळात आयआयआयटी पुणे भारतीय आयटी लँडस्केपवर कायमस्वरूपी प्रभाव पाडत राहील,’ असेही प्रा. काकडे म्हणाले.

विद्यार्थ्यांचा गौरव

बीटेक अभ्यासक्रमाच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल दिशा दुधाल, ऋतुजा मधुरे, सक्षम सचदेव आणि आदिती द्विवेदी यांना शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुदर्शन सरदार, साहिल गर्ग, हर्षिता द्वारचेर्ला आणि निखिता रामचंद्रन यांना एमटेक पदवीच्या पदवीधर बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल शैक्षणिक उत्कृष्टता पदक प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed