• Tue. Sep 15th, 2026
शेतीच्या वादातून अश्लील शिवीगाळ, भाजप महिला जिल्हाध्यक्षांच्या मुलाला बेदम मारहाण

गजानन पाटील, हिंगोली : हिंगोलीच्या वसमत शहरात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे यांच्या मुलाला शेतीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत उज्वला तांभाळे व त्यांचा मुलगा गौरव तांभाळे जखमी झाले आहेत. उज्वला तांभाळे यांची वसमत शहरालगत शेतीजमीन आहे आणि या शेत जमिनीच्या वादातूनच ही मारहाणीची घटना घडली आहे.हैद्राबाद येथील आरोपी मोहम्मद बेग आणि इतर चार आरोपी हे वसमत येथे आले असता आरोपी बेग आणि तांभाळे यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद झाला व त्यानंतर हाणामारी झाली आहे. या मारहाणी आरोपीने त्याच्या जवळील पिस्तूल बाहेर काढले होते व एक गोळी हवेत फायर झाल्याची देखील चर्चा आहे. या आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed