मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर होळीनिमित्त ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम – ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – कुर्ला ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/ पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.