• Mon. Nov 25th, 2024
    ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांचा दणका, सावकार नानासाहेब गायकवाडसह टोळीविरुद्ध मोक्का

    पुणे : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांनी याआधीच दोन वेळा मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) दाखल केलेला आहे. तरीही गायकवाडचे काळे कृत्ये थांबत नसल्याने त्यानंतर आता पुन्हा आणखी एकदा संघटित गुन्हेगारीचा टोळीप्रमुख नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड त्याची पत्नी नंदा व मुलगा गणेश यांच्यावर पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा मोक्का दाखल केला आहे. यावरून गायकवाड हा तीन तीन वेळा मोक्का लागणारा गुन्हेगार ठरला आहे.पुणे शहर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या तिसऱ्या मोक्का कारवाईला परवानगी दिली आहे. याबाबत चतुश्रुंगी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. आता तिहेरी मोक्का कारवाई झालेला नानासाहेब गायकवाड व कुटुंबीय पोलिसांच्या पुन्हा एकदा रडारवर आले आहेत. त्याने संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असून सदर टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भिती घालून बलाद्ग्रहण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न होत आहे.
    उद्धव ठाकरेंनी भर सभेत जाहीर केली उमेदवारी; काँग्रेसचा दावा असलेल्या सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी

    अलीकडेच औंधमधील एनएसजी आय.टी. पार्क, सर्जा हॉटेल लेन येथे नवीन इमारत नानासाहेब गायकवाड याच्या मालकीची आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पूर्णत्वाचे दाखल्यासह भोगवटापत्र मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक होते. मात्र पुणे महानगरपालिकेचे भोगवाटापत्रा शिवाय गायकवाड याने ही जागा स्टेट बँक ऑफ इंडियाला व्यावसायिक वापरासाठी दिली होती. या जागेचा वापर थांबविण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेच्या वतीने गायकवाडला दिली होती आणि नंतर महापालिकेने या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिसांकडे गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुढे पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिसांकडे पाठवला होता.

    नानासाहेब गायकवाड याचा प्रस्ताव व त्यासोबत सादर केलेल्या पुराव्याचे, कागदपत्रांचे अवलोकन व छानणी केली असता या गुन्ह्यामध्ये नानासाहेब गायकवाड त्याचा व्यावसायिक भागीदार प्रकाश कुलकर्णी, नंदा नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड व इतर अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed