• Mon. Nov 25th, 2024
    काँग्रेसकडून वसंत चव्हाणांना नांदेड लोकसभेची उमेदवारी, जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

    नांदेड: नांदेड लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षासाठी निश्चित झाली आहे. या पक्षाकडून आज महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात नांदेड लोकसभेचे उमेदवारी माजी आमदार वसंत चव्हाण यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता नांदेड लोकसभा निवडणूक भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार, हे स्पष्ट झालं आहे.
    अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक; काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी, ठाकरे गटाच्या नेत्याला देणार टक्करनांदेड जिल्हा हा सुरूवातीपासूनच काँग्रेसचा गढ मानला जातो. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहील आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाल्याने आता काँग्रेसचा गढ ढासळला आहे. काँग्रेसचे अनेक जण अशोक चव्हाण यांना समर्थन देत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेस बँक फूटवर आली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मातब्बर उमेदवाराचा शोध घेण्यात येत होता. कॉंग्रेसकडून सुरूवातीला शेकापच्या प्रदेशाध्यक्षा तथा भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांच्या नावाची चर्चा होती.त्यानंतर मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार राहिलेले प्रा यशपाल भिंगे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु होती. मात्र त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही. त्यातच माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाला काँग्रेसकडून पसंती दिली जात होती. चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठीने वसंत चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

    सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा, चंद्रहार पाटील म्हणतात ठाकरेंकडून माझीच उमेदवारी फिक्स!

    वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

    वसंत चव्हाण यांना २००२ साली राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. वसंत चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदी देखील होते. वसंत चव्हाण यांचे नायगाव बिलोली मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे. शिवाय अन्य विधानसभा क्षेत्रात त्यांचे नातेसंबंध देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed