• Mon. Nov 25th, 2024
    गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन

    पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका खडवासला मतदारसंघातून बसला होता. खडकवासला मतदारसंघांमधून सुप्रिया सुळे यांना मोठी पिछाडी मिळाली होती. त्याचवेळी बारामतीतून आघाडी मिळाली म्हणून विजय झाला. त्यावरच अजित पवार म्हणाले, महादेव जानकर जर कमळ या चिन्हावर लढले असते तर निवडून आले असते. मात्र मतदारांना आपण आवाहन केलं पाहिजे की काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ महायुतीत चिन्ह आहे.खडकवासला मतदार हा प्रामुख्याने कमळ चिन्ह पाहतो. आम्ही अनेक प्रयोग करून पाहिले उमेदवार बदलून पाहिले, पण त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.बारामती लोकसभातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खडवासला मतदारसंघचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप कायम, राऊतांच्या विरोधात महायुती कोणाला देणार संधी?लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कंबर कसली आहे. महायुतीसोबत लोकसभा मतदारसंघाचे दौरे आणि बैठका सुरू केल्या आहेत. बारामती लोकसभा निवडणूक अधिकृत उमेदवारीची घोषणा झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी आज त्यांनी खडवासला मतदारसंघात बैठक घेत घड्याळ चिन्हाबाबत चिंता व्यक्त केली.

    अजित पवार म्हणाले, काही मतदारसंघामध्ये लोकांना समजून सांगावं लागेल येथे घड्याळ आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघात आपलं चिन्ह हे कमळ आहे. पुढे हडपसर (शिरूर) लोकसभेसाठी आपले चिन्ह हे घड्याळ असेल. मावळसाठी आपले चिन्ह धनुष्यबाण असेल असं म्हणता खडवासला मतदारसंघामधील घड्याळाचा प्रचार करत शिरूरमध्ये देखील घड्याळ असल्याचा संकेत दिले आहेत. खडकवासला मतदारसंघांमध्ये घड्याळ या चिन्हाला फार काही मत मिळाली नाही. आम्ही उमेदवार दिला पण तो पराभूत झाला. एकदा वांजळे ताईंना पण आम्ही निवडणून आणण्याचा प्रयत्न केला. परंतू भीमराव अण्णा यांनी त्यांचा प्रभाव केला.

    या म्हणाले तर आमचे सगेसोयरे शेपूट हलवत जातायत, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा समाचार

    महादेव जानकर हे लोकसभेसाठी लढत होते. त्यावेळी त्यांचं चिन्ह हे कपबशी होत. मात्र तरीसुध्दा त्यांनी ६५ हजारचा लीड घेतला होता. पण लोकांना माहित नव्हती ती कप बशी मोदी साहेबांना मतदान करणारी आहे. लोकांना माहिती असतं तर लाखांचा फरक त्यावेळेस पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed