• Mon. Nov 25th, 2024
    तुम्हाला CM आणि संग्रामला मंत्री होऊ दिलं नाही, शिवतारेंनी इतिहास सांगत पवारविरोधी वात पेटवली

    पुणे : बारामती लोकसभेतील पवारविरोधी पाच लाख मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही शिवसेना नेते विजय बापू शिवतारे यांनी शड्डू ठोकण्याचे ठरवले आहे. बारामती जिंकायची असेल तर ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांचे मतरूपी आशीर्वाद मोलाचे ठरतील, याची जाणीव ठेवून त्यांनी बुधवारी उभय नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि पवार घराण्याने तुमच्यावर कसा अन्याय केला, याचा पाढाच वाचला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नणंद आणि भावजय यांच्यात ही निवडणूक होणार आहे. दोन्ही पवारांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. महायुतीमध्ये असूनही त्यांनी उघडपणे पवार यांना आव्हान देणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परिणामी, विजय शिवतारे यांनी मतदारसंघातील जनतेशी आणि नेत्यांशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. थोपटे यांचा पवारविरोध लक्षात घेऊन भोरची मदत असल्याशिवाय आपण बारामती जिंकू शकत नाही, हे शिवतारे यांना पक्के माहिती असल्याने त्यांनी बुधवारी थोपटे कुटुंबाची भेट घेतली.
    ‘ते’ त्यांच्या कर्माने मरतील, त्यांच्या पराभवाचे धनी आपण व्हायला नको, मला शिंदे म्हणाले : विजय शिवतारे

    तुम्ही CM झाला असते, संग्राम मंत्री झाले असते, पण….

    बारामती लोकसभा मतदारसंघात मी जनतेचा कानोसा घेतोय. नेहमी नेहमी पवारच का? असे प्रश्न मला जनता विचारत आहे. शिवाय बारामती वगळता इतर मतदारसंघावर नेहमी नेहमी अन्याय होत आलाय, अशीही लोकांची तक्रार आहे. मी तर लोकांसमोर जाऊन पवारांनी केलेला अन्याय उघड उघड मांडतोय. अगदी तुमचं उदाहरण देखील मी अनेक ठिकाणी दिलं. भोरचे सुपुत्र मुख्यमंत्री झाला असते, संग्रामदादा मंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष झाले असते. मी या घटनेचा साक्षीदार आहे, परंतु पुण्यात आपल्यापेक्षा कुणी मोठा व्हायला नको, अशी भावना ठेवून पवारांनी कायम आपल्याला विरोध केला. शरद पवार यांनी मागील आठवड्यापूर्वी भोरमध्ये येऊन २५ वर्षानंतर सांगितलं की मी थोपटे यांच्यामागे उभा आहे, आता काय फायदा आहे? असा सवालही शिवतारे यांनी उपस्थित केला.
    शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हेलिकॉप्टरने आले पण ७ तास ‘वेटिंग’वर, नरमाईची भूमिका घेत म्हणाले…

    साडे पाच लाख मते पवारविरोधी, त्यांनी कुठे जायचे?

    जर बारामतीत ६ लाख ८६ हजार मते पवारांच्या बाजूने आहेत तर साडे पाच लाख मते पवारविरोधी आहेत ना… एका बाजूला नणंद आणि एका बाजूला भावजय… अशावेळी साडेपाच लोकांनी जायचे कुठे? लोकांना पवारविरोधी मतदान करायला माझ्या रुपाने संधी मिळेल, त्यांना लोकशाहीत बदल घडविण्याचा प्रक्रियेत भाग घेता येईल, असे शिवतारे म्हणाले.
    एक भावजय विरोधात, दुसरी साथीला, सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांच्या मातोश्री मैदानात

    पुरंदरला कसे वातावरण असेल? असा प्रश्न थोपटे यांनी विचारला. त्यावर शिवतारे म्हणाले, पुरंदरला एकहाती आपल्याला मतदान होईल. अजित पवार यांच्यात प्रचंड गुर्मी आहे. माझा आवाका त्यांनी पुरंदरमध्ये येऊन काढला. मी त्यांना माफ केलेय पण जनतेच्या मनात राग आहे. ते सांगतायेत बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवार यांना मतदान करणार नाही. फक्त पुरंदरच नाही तर दौंड-इंदापूरला देखील लोकांच्या याच भावना आहेत. त्यामुळे यंदा बारामतीचा ‘निकाल’ नक्की लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    माझा आवाका कळेल, एवढा का घाबरतो? शिवतारेंचा अजितदादांवर हल्लाबोल

    त्याचवेळी पवार घराणे मोठे आहे. पण यंदा काय व्हायचे ते होऊन जाऊ दे… गोळ्या घालतील, फाशी देतील पण माघार घेणार नाही, असे स्पष्ट सांगून शिवतारे यांनी आपले पुढील इरादे स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed