• Mon. Nov 25th, 2024
    मला लोकसभा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह पण….. शरद पवार नवा डाव टाकणार?

    पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र अंतिम टप्प्यात आलेले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मला कार्यकर्ते आग्रह करतायेत. परंतु माझ्या डोक्यात तसा विचार नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी १४ निवडणुका लढलो, आता किती निवडणुका लढू? असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीतच्या फुटीनंतर आणि पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उभे राहू शरद पवार नवा डाव टाकणार का? ही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी लोकसभेचं जागावाटप, मतदारसंघांचं गणित, वेगवेगळी राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आदी विषयांवर शरद पवार यांनी आपली मतं मांडली.
    शरद पवार सांगतील तो आदेश मान्य, त्यांना सोडून दुसरीकडे जाणं एवढं सोपं आहे का? : निलेश लंके

    मला लोकसभा लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह पण…..

    मी लोकसभा निवडणूक लढवावी, असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खास करून मला पुण्यातून लढण्याचा आग्रह होतोय. त्याचबरोबर सातारा आणि माढ्यातूनही कार्यकर्ते आग्रह करत आहेत. परंतु मी माझ्या राजकीय आयुष्यात एकूण १४ निवडणुका लढलो आणि जिंकलो, आणखी किती निवडणुका लढवणार…? असा प्रश्न उपस्थित करत तसेही मी यापूर्वीच आता लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलेली आहे, असे सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत.
    विचारधारेची गोष्ट सांगितली, तुतारी हाती घेतली, पण निवडणुकीची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात, लंके म्हणतात….

    परंतु शरद पवार यांच्या प्रत्येक विधानामागे काही ना काही अर्थ दडलेला असतो. प्रत्येक शब्द तोलून मोजून बोलणारे नेते म्हणून शरद पवार यांना महाराष्ट्र ओळखतो. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र अद्याप अंतिम झालेले नसताना पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पात ‘मला निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे’ असे शरद पवार यांनी का सांगितलेले असावे, याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.
    इकडे सुजय विखेंचं तिकीट जाहीर, तिकडे शरद पवारांनी डाव टाकला, निलेश लंकेंचा उद्या प्रवेश!

    दोघे भेटायला येतील, काय ते उद्याच ठरवू

    दुसरीकडे बीड लोकसभा मतदारसंघातून मविआकडून ज्योती मेटे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर उभे राहतील, अशी चर्चा आहे. परंतु दोघेही उद्या मला भेटायला येणार आहे. त्यावर उद्याच चर्चा केली जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

    सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवारांच्या टीकेवर बारामतीकरांच्या प्रतिक्रिया काय?

    शिवतारेंचा राग अजितवर जास्तच दिसतोय

    बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात उघड भूमिका घेऊन विजय शिवतारे यांनी त्यांना प्रचंड लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यावरही शिवतारे यांनी आपली तलवार मान्य करण्यास नकार दिलेला आहे. लोकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी मात्र अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले करणे त्यांनी सुरूच ठेवले. याविषयी शरद पवार यांना विचारले असता, शिवतारेंचा राग अजितवर जास्तच दिसतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed