मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस १६, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी १० जागांवर लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे १५ उमेदवार निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. चार जागांवरुन तिढा कायम असून त्यांचा निकालही लवकरच लागणार आहे. ठाकरेंनी तीन ‘संजय’वर विश्वास दाखवल्याचं दिसत आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, तर परभणीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जाधवांसह अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर अशा पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांचे संभाव्य १५ उमेदवार
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई – अमोल कीर्तिकर
ठाणे – राजन विचारे
मुंबई महानगराबाहेरचे उमेदवार
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
रायगड – अनंत गिते
हातकणंगले – राजू शेट्टी (बाहेरुन पाठिंबा)
मावळ – संजोग वाघेरे
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
परभणी – संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News