• Sat. Sep 21st, 2024
मुंबईतील सभेत फारूख अब्दुल्ला यांचं ईव्हीएम मशीनवर वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले?

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी आज म्हणजेच रविवार १७ मार्चला मुंबईतील इंडिया अलायन्सच्या मेळाव्यात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांनी ईव्हीएमला चोर म्हणत युतीचे सरकार आल्यास मशीन काढून निवडणूक आयोगाला मोकळे केले जाईल, असे सांगितले.दरम्यान आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये इंडिया अलायन्सची मेगा रॅली होत आहे. या सभेसाठी राहुल गांधींव्यतिरिक्त काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि भारत आघाडीचे इतर नेते आले आहेत. या सभेसोबतच राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान यावेळी फारूख अब्दुल्ला याचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहिते पाटील अॅक्शन मोडमध्ये, तातडीची बैठक बोलवली, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

फारुख अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले?

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, तुम्हाला मत वाचवायचे आहे. हे मशिन (ईव्हीएम) चोर आहे, मशीन काढण्यासाठी आम्ही खूप आवाज केला पण तसे झाले नाही. ‘भारत’ आघाडीचे सरकार आले तर मशीन काढून निवडणूक आयोगाला मुक्त करणार. निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, आपण एकत्र येऊन संविधान वाचवू आणि भारत वाचवूया. राहुल गांधींनी त्या लोकांना मिठी मारली ज्यांच्यामध्ये देश राहतो, ज्यांना कोणीही आलिंगन देत नाही. आज देशाचे संविधान आणि परंपरा जतन करण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed