• Sat. Sep 21st, 2024

नाशिक शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून टवाळखोरांना ‘खाकी’चा दणका ! संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात

नाशिक शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून टवाळखोरांना ‘खाकी’चा दणका ! संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘स्ट्रिट क्राइम’ नियंत्रणासह शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तेथील टवाळखोरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. चार महिन्यांत तब्बल अकरा हजार संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर आयुक्तालयाने संशयितांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईलाही सुरुवात करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी संबंधित ‘प्रभारी’ निरीक्षकांना सूचित केले आहे. त्यान्वये, शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत शहरात अकरा हजार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधितांची यादीदेखील पोलिस ठाण्यांनी तयार केली आहे. सातत्याने टवाळखोरी करणाऱ्यांसह विविध गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मोक्का, तडीपारी, एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. शहरातील तीन टोळक्यांवर नुकतीच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर अनेक सराइत गुन्हेगारांना तडीपार केल्याची माहिती आयुक्तालयाने दिली. गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयितांनाही दीड वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासह लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे चोख नियोजन आयुक्तालयाने हाती घेतले आहे.

लोकसभेचं बिगुल वाजलं; मुंबई, ठाणे, पुणे शहरांमध्ये टॉवर तसेच गृहसंकुलांत उभारणार १५० मतदानकेंद्रे

टवाळखोर कारवाई…

परिमंडळ – १

पंचवटी – १,३३१

आडगाव – १,६४६

म्हसरूळ – ६७२

भद्रकाली – २८७

सरकारवाडा – १,३२७

गंगापूर – ७४६

मुंबई नाका – ४९८

परिमंडळ – २

सातपूर – ५१८

अंबड – २,१५३

इंदिरानगर – ८८७

नाशिकरोड – ४२९

देवळाली कॅम्प – ६३३

उपनगर – ६७९

पॉइंटर्स…

– ११ हजार ८०६ टवाळखोरांवर कारवाई

– ९९२३३२३३११ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी

– टवाळखोरांचे अड्डे, माहिती व्हॉटसअॅपद्वारे कळविण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed