• Sat. Sep 21st, 2024

विश्वजीत कदम विमानाचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण तिकीट न मिळाल्यास वेगळा विचार… : विशाल पाटील

विश्वजीत कदम विमानाचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण तिकीट न मिळाल्यास वेगळा विचार… : विशाल पाटील

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या उमेदवारीस इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी आपण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. परंतु काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही, तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट करत भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चा उडवून लावल्या. आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजित पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, असं विशाल पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन समारंभ सोहळ्यात विशाल पाटील बोलत होते.

आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्षा गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव-सांगली करतो. राजा- राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो अशी टीका विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यावर केली.
पुण्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीस विरुद्ध तावडे सुप्त संघर्षाची शक्यता
कॉंग्रेस पक्ष आज जोमाने काम करतोय. तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातोय यांचा आनंद आहे. पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडतायत, कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल असेही विशाल पाटील म्हणाले.

मी कोणताही निर्णय घेणार नाही, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर विश्वजीत कदम यांच्या राजीनाम्याची चर्चा!

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र आता आमची भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजित पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातायत, मात्र वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे म्हणत विशाल पाटील यांनी अपत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नसल्याचे संकेत दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed