• Mon. Nov 25th, 2024
    Supriya Sule: दमदाटी करायची नाय, मी ढाल बनून उभी! पवारांनंतर सुप्रिया सुळेंचा आमदारांना दम

    पुणे: लोणावळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक आमदार धमकी देतात, अशी तक्रार शरद पवारांना मिळाल्यानंतर शरद पवारांनी स्थानिक आमदारांची कानउघडनी केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांना सुनावलं आहे. बारामतीत लोकसभा मतदार संघात आजपासून कोणीही दमदाटी करायची नाय, केली तर बारामती लोकसभेची खासदार म्हणून मी ढाल बनून उभी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी आमदारांना ठणकावलं. तसेच, दमदाटीला बिलकुल घाबरू नका, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांना केले आहे.

    भोर येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषणं प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.

    यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या इंदापूर येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना दमदाटी करण्यात आली. मात्र, आज मी इथे देखील प्रत्येकाला सांगते दमदाटी करायची नाय, हा बारामती लोकसभा मतदार संघ आहे आणि मी तिथली खासदार आहे, बारामती लोकसभेतील माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्यांनासमोर मी तिथे ढाल बनून उभी आहे, नंतर गाठ त्यांच्याशी आहे, असं म्हणत दम देणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी भर भाषणात तंबी दिली आहे. यामुळे बाप लेक दोन्ही आता आक्रमकपणे निवडणूक प्रचारात उतरल्याचे पहायला मिळतं आहे.

    संघर्ष करावा लागतोय

    आधी केंद्रात आणि राज्यात काँगेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे जास्त संघर्ष करण्याची कधी वेळ आली नव्हती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करावा लागतो आहे आणि त्याची आता सवय झाली आहे. कार्यकर्त्यांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहे. पण, हा माझा बारामती लोकसभा मतदार संघ आहे, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली तर आधी गाठ माझ्याशी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणल्यात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *