• Sat. Sep 21st, 2024

विषमुक्त शेतीसाठी सरकारी नोकरीवर पाणी, गांडूळ खतापासून लाखोंचे उत्पन्न, काव्या दातखिळे यांची यशोगाथा

विषमुक्त शेतीसाठी सरकारी नोकरीवर पाणी, गांडूळ खतापासून लाखोंचे उत्पन्न, काव्या दातखिळे यांची यशोगाथा

जुन्नर: विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुंबईतील नोकरी सोडून जुन्नर तालुक्यातील मूळ गावी दातखिळेवाडीला परतलेल्या काव्या दातखिळे सध्या परिसरात उद्योजक म्हणून नोवारूपाला आल्या आहेत. शेतीमध्ये ‘करिअर’ करून कृषीकाव्या सध्या गांडूळ खत उद्योगातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.रासायनिक खतांचा मारा, कीटकनाशकांचा वापर यातून मानवी शरीराला वाचवण्यासाठी विषमुक्त शेती हाच पर्याय आहे, अशी खूणगाठ मनाशी धरून काव्या दातखिळे यांनी मुंबईच्या शीव रुग्णालयातील दरमहा ७५ हजार रुपये पगाराची नोकरी सोडली. त्या आपल्या गावी दातखिळेवाडीच्या शेतावर आल्या. तेथे गांडूळ खत उत्पादन सुरू केले. वडील शेतकरी असल्याने, शेतीशी नाते लहानपणापासून होते. त्याच शेतील काव्या यांनी करिअर बनवले. सध्या त्या गांडूळ खताच्या एका बॅचमधून सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. हा प्रकल्प उभारणीबरोबरच काव्या इतर शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीचे मार्गदर्शन आणि गांडूळ खताच्या वापराविषयी प्रशिक्षणही देतात. त्यांचे पती राजेश यांनीदेखील अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी सोडून काव्या यांना या उद्योगउभारणीत साथ दिली आहे. काव्या दातखिळे यांच्या सर्वच कामात ते सहकार्य करून वेळ देत आहेत.

एकरी १५० टन उसाचे उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शेतकरी महिलेचा प्रेरणादायी प्रवास

चौकट …

धाडसी निर्णयक्षमता असेल तर मातीतूनही सोने निर्माण करता येते, हा धडा मी घेतला आहे. कष्टाला धाडसाची जोड असेल तर उत्कर्ष होणार यात यत्किंचितही शंका नाही.

– काव्या दातखिळे, प्रयोगशील शेतकरी, दातखिळेवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed