• Mon. Nov 25th, 2024

    साहसी पर्यटनातही ‘नारीशक्ती’, दीड हजार किमीचा पल्ला गाठला, उपराजधानीतील महिला ठरल्या ‘बाइकर्स क्वीन्स’

    साहसी पर्यटनातही ‘नारीशक्ती’,  दीड हजार किमीचा पल्ला गाठला, उपराजधानीतील महिला ठरल्या ‘बाइकर्स क्वीन्स’

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साहसी पर्यटनात महिला कुठेही मागे नाहीत, हे दर्शविण्यासाठी सीएसी ऑलराउंडर्सने घेतलेल्या ऑल विमेन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या सहा महिला बाइकर्सनी १ हजार ४४० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत क्वीन्स ऑन द व्हील’ होण्याचा मान पटकावला.महिला बाइकर्ससाठी असलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला महिलांनी २ मार्च रोजी सुरुवात केली. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या या मोहिमेत महिला बाइकर्सनी त्या भागातील समृद्ध स्थळांना भेटी देत तिथल्या विविधरंगी संस्कृतीचा अभ्यास केला. तसेच घनदाट जंगलांमध्ये साहसी प्रवास केला. या ‘ट्रेल’मध्ये शहरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम विभागातील प्रा. शिल्पा पुरी, छायाचित्रकार ॲलेक्झांड्रा निर्वाण, पॅरामेडिकल टेक्निशियन रुचिका मेघे, आयआयएम नागपूरची विद्यार्थिनी आग्या जैन, निसर्गोपचारतज्ज्ञ मैथिली सिंग व क्रीडा प्रशिक्षक कांचनी यादव या बाइकर्स सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेत नागपूरसह हैदराबाद, भुवनेश्वर, मुंबई, पुणे, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील १९ महिला यात सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी सांची, चंदेरी, कुनो, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो आणि भोपाळ असा सुमारे १ हजार ४४० किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ दिवसांत पूर्ण केला. या मोहिमेचा समारोपीय सोहळा आज, ८ मार्च रोजी महिलादिनानिमित्त भोपाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

    सातवी पास रुक्मिणी पटसागळेची किमया, रुमा हस्तकारीच्या माध्यमातून महिलांना दिला रोजगार

    महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्‍यासोबतच मध्य प्रदेशला महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सशक्त स्थान म्हणून प्रदर्शित करणे, हा या ट्रेलचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सीएसी-ऑलराउंडर्सचे संचालक अमोल खंते यांनी दिली. या मोहिमेच्‍या यशस्वितेसाठी सीएसी-ऑलराउंडर्सच्‍या संयोजक एकता खंते, स्वप्नील कपूर, अमोल वडीखाये, राहुल आनंद व अजय गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed