अब्दुल सत्तार गुरुवारी नागपुरात पोहोचले होते. जिथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. सत्तार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसाचे १८ तास काम करत आहेत. त्यांच्यासोबत १३ खासदार, ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला १३ पेक्षा जास्त जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळेच संभाजीनगरची जागा आमचीच आहे.
आमची निशाणी ही धनुष्यबाण आहे आम्ही शिवसेना आहोत
शिवसेनेचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर सत्तार म्हणाले, आमची निशाणी ही धनुष्यबाण आहे आम्ही शिवसेना आहोत, आमचे नेते एकनाथ शिंदे आहे. आणि आतापर्यंत आमच्यात जी चर्चा झाली त्यात धनुष्यबाणा शिवाय पर्याय नाही. कोणी काहीही बोलले ज्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची इच्छा आहे किंवा त्यांना कमळ चिन्हाची आठवण येत असेल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि ते काय बोलतील ते ऐकून घ्यावे.
