चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघावर भाजपाने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाच्या ताब्यात असलेली ही जागा काँग्रेसचे दिवंगत खासदार बालू धानोरकर यांनी काँग्रेसला मिळवून दिली. या मतदार संघात खासदार धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाला वाढवले. एकीकडे काँग्रेस मजबूत होत असतानाच काँग्रेस पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी खासदार धानोरकर यांना विरोध केला होता. या विरोधाला खासदार धानोरकर पुरून उरलेत. मात्र त्यांचा अवेळी जाण्याने चंद्रपूर लोकसभा संघ पोरका झाला. त्यांचा पत्नी आमदार धानोरकर यांच्याबद्दल मतदार संघात सहानुभूती निर्माण झाली.
आमदार धानोरकर यांच्याकडे भावी खासदार म्हणून बघितले जात होते. पक्ष्यातील वरिष्ठ नेते आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी उभे होते. मात्र एनवेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवू असे वक्तव्य केले. याची चर्चा संपत नाही तेच वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी ‘ आत्ता संसदेतून आवाज उठवणार ‘ असे ट्विट केले. जिल्हातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या भेटीगाठीचा सपाटा लावला. शिवानी यांची सक्रियता राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला. अशात आमदार प्रतिभा धानोरकर यांचे ट्विट आले. यात त्यांनी म्हटले ‘ ना राजकीय स्वार्थासाठी, भेटी गाठी फक्त विकासासाठी ‘. आमदार धानोरकर यांनी केवळ दोन ओळी लिहिल्यात. यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नाही.
मात्र आमदार धानोरकर यांनी मारलेला टोला शिवानीसाठी होता, अशी चर्चा सुरु आहे. काँग्रेसने अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही.त्या आधीच काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ दिसत आहे. चंद्रपूर लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचा अंतर्गत कलह बघता ही जागा जिंकणे भाजपासाठी अधिक सोपी झाली आहे.