• Sat. Sep 21st, 2024
मला जिल्हा परिषदेपासून सुरूवात करायची होती पण…. वडेट्टीवारांच्या लेकीचा लोकसभेसाठी शड्डू

नागपूर : मला खरे तर जिल्हा परिषदेतूनच राजकीय कारकीर्दीची सुरुवात करायची होती. पण, या सरकारने निवडणुका टाळल्याने ती संधी हिरावली गेली. हा लोकशाही संपविण्याचा प्रयत्न असल्याचे मी आता भर संसदेतून संपूर्ण देशाला सांगेन. मी सक्षम नसेल तर मला मतदार नाकारतील. केवळ वडिलांच्या नावावर नव्हे तर स्वत:च्या कामाच्या बळावर मी तिकीट मागितले आहे, असे रोखठोक वक्तव्य करीत प्रदेश काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आपला दावा प्रथमच जाहीर केला.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव समोर आल्यानंतर काँग्रेसमधून कोण? हा प्रश्न चर्चेला येऊ लागला असतानाच शिवानी यांनी उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, चंद्रपूर हा औद्योगिकदृष्ट्या महत्वपूर्ण भाग आहे. सीटीपीएस, सिमेंट आणि इतर अनेक बडे उद्योग या भागात उभे राहिले. कंत्राटी कामगारांचे प्रश्नही ओघाने वाढले. या कामगारांसाठी मागील चार वर्षांपासून सातत्याने मी लढा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी तीन दिवस अथक आंदोलन केले. त्यांना यश मिळवून दिले. चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीत महासचिव म्हणून काम केले. नंतर सर्वाधिक मतांनी निवडून येत प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची महासचिव झाली. २०१९च्या निवडणुकीत ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात काम केले. सध्या काँग्रेसकडून तिकीट मागणाऱ्यांपेक्षा पक्षात नक्कीच अधिक काळापासून काम करीत आहे. त्यामुळे माझा दावा अधिक प्रबळ आहे, असेही त्या म्हणाल्या.
अजूनही मैदानात आहे… मी पक्षाशी एकनिष्ठ, चार वेळा चंद्रपूर लोकसभा जिंकणाऱ्या हंसराज अहिर यांची रिंगणात उडी

‘तिकीट मागण्याचा हक्क प्रत्येकाला’

खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर आमदार प्रतीभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दावा सादर केला आहे. तिकीट मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. ते कुणाला द्यायचे हा अधिकार सर्वस्वी पक्षाचा आहे. लोकसभा जिंकणे हे पक्षाचे ध्येय असल्याने सक्षम उमेदवारालाच तिकीट दिले जाईल, असा विश्वासही शिवानी यांनी व्यक्त केला.
…तर मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील, वडिलांनंतर सुपुत्र योगेश कदमांचाही भाजपला इशारा

मागच्या निवडणुकीत अनेक जागांवर चार-पाच हजार मतांनी काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले. भाजपच्या तुलनेत काँग्रेसची मते विभागली गेली. वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्याचाही परिणाम जाणवला. ही निवडणूक विचारांची असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जपणूक कोण करतेय हे पाहिले जाईल. या निवडणुकीत वंचित आमच्यासोबत असेल, असा विश्वास शिवानी यांनी व्यक्त केला.
उमेदवारी नाकारल्यावर प्रज्ञा सिंह ठाकूरची पहिली प्रतिक्रिया; थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी पात्र

‘भारत जोडो यात्रा’, ‘भारत न्याय यात्रा’च्या माध्यमातून राहुल गांधी प्रत्येकाशी बोलत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. बहुजनांचे प्रश्न समजून घेतात. पंतप्रधानपदासाठी ते नक्कीच पात्र आहेत, असा विश्वासही शिवानी यांनी व्यक्त केला. देशात ओबीसी सर्वाधिक संख्येत आहेत. तरीही अपेक्षित प्रमाणात त्यांना न्याय, संधी मिळत नाही. जातनिहाय जनगणना झाली तर ही अडचण दूर होईल. राहुल गांधी यांची जातनिहाय जनगणनेची मागणी योग्य असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी, पण जागावाटपाचा घोळ; धैर्यशील माने पुन्हा खासदार की पत्ता कट?

मेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे, पक्षाचा निर्णय मला मान्य असेल

संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल, असंही शिवानी यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed