• Mon. Nov 11th, 2024
    बेवारस कुत्र्यानं मनं जिंकली, ‘मोती’च्या मृत्यूने कॉलनी हळहळली

    चंद्रपूर : एखाद्याचा लळा लागला की त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती केवळ माणसातच नाही तर मुक्या जनावरातही दिसते. याचाच प्रत्यय चंद्रपुरात आला आहे. एका बेवारस कुत्र्याने लोकांना लळा लावला. त्याच नाव होतं ‘मोती’. श्रीनगर कॉलनीतील अस एकही घर नसावं ज्यांचं मन मोतीने जिंकलं नाही. या मोतीचं अकाली निधन झालं. त्याचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. माणसाप्रमाणे मोतीचे अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपूरी शहरात येणाऱ्या देलनवाडी परिसरातील श्रीनगर कॉलनीत काही वर्षांपूर्वी एक कुत्र्याचं पिल्लू आढळलं होतं. प्रेमळ स्वभावाचा असलेल्या या कुत्र्याचं त्यांनी ‘मोती’ असं नामकरण केलं. ‘मोती’ हा कुणाच्या मालकीचा नव्हता. आपल्या स्वभावाने तो सर्वांचा लाडका झाला होता. कॉलनीत येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर तो भुंकायचा. एक प्रकारे तो कॉलनीचा चौकीदारच झाला होता. भूक लागली की तो कुणाच्या तरी दारासमोर उभा राहायचा. त्याला भूक लागली हे ओळखून त्याला कॉलनीतील ते अन्न द्यायचे.
    विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेची तारीख जाहीर, हॉलतिकिटंही वाटली; पण परीक्षा घ्यायचाच विसर

    मागील काही दिवसापासून ‘मोती’ आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचारला ‘मोती’ प्रतिसाद देत नव्हता. अशातच दिर्घ आजारामुळे मोतीचे निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली. सर्वांचा लाडका असलेल्या ‘मोती’चे अंतिमसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्व कॉलनीवासियांनी अतिशय दु:खद अंतःकरणाने मोतीला अखेरचा निरोप दिला. राजेंद्र अतकरे, दिपक मडावी, नंदुरकर, माला मडावी, संध्या बोड्डावार, सुभाष बोड्डावार कोरे, डॉ.नरेश देशमुख, सौ.देशमुख ,वैशाली शेन्डे, सौ.मैद अंतिम संस्कारात उपस्थित होत्या.

    मोतीच्या जाण्याने कॉलनी पोरकी झाली आहे. कॉलनीसाठी रात्रभर जागणाऱ्या मोतीची उणीव त्यांना जाणवत आहे. कॉलनीकरांना लळा लावणारा ‘मोती’ आणि मोतीवर जीवापाड प्रेम करणारे कॉलनीकर यांचं नातं, प्रेम विसरणार्‍यांना प्रेरणादायी ठरणारं आहे. मोतीचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंतिमसंस्कार केल्यानंतर कॉलनीतली लोकांनी मोतीची तेरावी केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed