• Sat. Sep 21st, 2024

Kolhapur Lok Sabha Constituency: शाहू महाराजांबद्दल आदर वाटतोय ना? मग ‘हे’ कराच; सतेज पाटलांचे महायुतीला आवाहन

Kolhapur Lok Sabha Constituency: शाहू महाराजांबद्दल आदर वाटतोय ना? मग ‘हे’ कराच; सतेज पाटलांचे महायुतीला आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूरचे पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायच असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत.महायुतीच्या नेत्यांना शाहू महाराजांबद्दल आदर वाटत असेल तर त्यांनी शाहू महाराजांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे असे, आवाहन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केले. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारकी लढवण्याचा निर्णय मागे घेतल्याबद्दल आणि शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संभाजीराजेंनी घर म्हणून त्यांची जबाबदारी ओळखत घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. महाविकास आघाडी म्हणून ही जागा काँग्रेसला यावी आणि या जागेवरून शाहू महाराज छत्रपती लढावे ही आमची आणि तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती आणि यामुळे कोल्हापूर चे हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न असेल, असे ही सतेज पाटील म्हणाले आहेत ते आज कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर शाहू महाराज सक्षम उमेदवार

राज्यात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजल असून महाविकास आघाडी कडून जागा वाटपाचं काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कोल्हापुरच्या जागे संदर्भात देखील आघाडीत सकारात्मक चर्चा सूरू आहेत. येत्या दोन दिवसात वरिष्ठ नेते सर्व जागा आणि उमेदवारांची घोषणा करतील. आमच्यात कोणताही वाद विवाद नाही. आमच धोरण पक्क आहे. भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी आहे आणि देशात व राज्यात जे काही कारभार सुरू आहे त्या विरोधात सक्षम उमेदवार देणे आणि तो निवडून आणणे हे आमचा धोरण आहे. कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याला यश येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरने संपूर्ण देशाला पुरोगामी विचार दिला आहे. हा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर महाविकास आघाडीसाठी शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत, असे आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत.

…तर शाहू महाराजांना बिनविरोध लोकसभेवर पाठवा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येत आहे. जिल्ह्यात आणि राज्यातील सर्व नेत्यांमध्ये छत्रपती घराण्याविषयी सर्वांना मोठा आदर आहे. यामुळे शाहू महाराजांनी राजकारणात येऊ नये, असेही मत व्यक्त करत आहेत. या संदर्भात सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरंच आदर असेल तर त्यांनी शाहू महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवाव. एका बाजूला आदर आहे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीत त्यांना निवडणुकीला उभे राहू नये अशी विनंती करतात.मात्र हा विषयांतराचा भाग आहे या विषयात जास्त पडायची गरज नाही महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार आहे, असे आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed